HomeमनोरंजनKangana Ranaut : मोनालिसाच्या सावळ्या रंगावर भाळली कंगना, म्हणाली

Kangana Ranaut : मोनालिसाच्या सावळ्या रंगावर भाळली कंगना, म्हणाली

Subscribe

प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यातील अनेक फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कुंभमेळ्यात रुद्राक्ष माळा विकण्यासाठी आलेली मोनालिसा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. जो तो तिच्या सौंदर्याबद्दल बोलत आहे. मोनालिसाच्या नॅचरल लूकचे नेटकऱ्यांनी प्रचंड कौतुक केले. यानंतर आता बॉलिवूड सिनेविश्वाची धाकड गर्ल अर्थात कंगना रनौतने देखील मोनालिसाच्या सावळ्या रंगाची प्रशंसा केली आहे. शिवाय तिला स्वतःच्या रंगाबाबत न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही, असेही तिने म्हटले. (Kangana Ranaut Shared special post for viral girl monalisa)

मोनालिसाला सावळ्या रंगाचा न्यूनगंड

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बिंधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर तिच्या बेधडक व्यक्तिमत्वाची कायम चर्चा असते. असे असले तरीही अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे अभिनेत्री अडचणीत आली आहे. पण याचा कंगनावर कधीच काही फरक पडला नाही. सिनेविश्वातील तिची जागा जशी होती तशीच आहे. एखाद्या विषयावर मत मांडताना कंगना कधीच मागचा पुढचा विचार करत नाही. सध्या तिने कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसाबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चर्चेत आले आहे.

मोनालिसा ही महाकुंभमेळा 2025 मध्ये रुद्राक्ष माळांची विक्री करण्यासाठी आपल्या कुटुंबियांसोबत आली होती. दरम्यान, सोशल मीडियावर तिचा एक फोटो व्हायरल झाला आणि जो तो तिच्या सौंदर्याबद्दल बोलू लागला. कुंभमेळ्यात बरेच लोक तिचा शोध घेताना दिसले. अनेकांनी तिच्याशी फोटो काढण्याचे प्रयत्न केले. ज्याला वैतागून मोनालिसाच्या कुटुंबीयांनी तिला पुन्हा घरी पाठवून दिले. पण मोनालिसाचे सौंदर्य पाहून बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी तिला सिनेमाची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता लवकरच मोनालिसा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. तत्पूर्वी तिने स्वतःच्या सावळ्या रंगाबाबत न्यूनगंड व्यक्त केला आहे. यावर कंगनाने आपले मत मांडले आहे.

काय म्हणाली कंगना?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने मोनालिसाविषयी बोलताना एक पोस्ट शेअर केली आहे. अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना कंगना म्हणाली, ‘ही तरुण युवती मोनालिसा तिच्या प्राकृतिक सुंदरतेमुळे सोशल मीडिया सेन्सेशन बनली. मला लोकांचं तिला फोटो आणि इंटरव्ह्यूसाठी त्रास देणं अजिबात आवडत नाहीये. हे फारच निराशाजनक आहे. हे पाहून मी विचारात पडलेय की, ग्लॅमरच्या जगात आपल्याकडे कोणी कृष्णवर्णीय भारतीय महिला प्रतिनिधित्व करण्यासाठी उरलीये का? लोक आजच्या अभिनेत्रींवर अनु अग्रवाल, काजोल, बिपाशा, दीपिका किंवा राणी मुखर्जीसारखे प्रेम करतात का? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुढे तिने लिहिलंय, ‘आजकाल सिनेविश्वातील सर्व अभिनेत्री गोऱ्या आहेत. ज्यातील काही त्यांच्या तरुण वयात सावळ्या रंगाच्या होत्या. का या अभिनेत्री मोनालिसासारखी स्वतःची ओळख बनवू शकत नाहीत? कदाचित हा खूप जास्त लेझर आणि ग्लूटाथियोन इंजेक्शनचा वापर करण्याचा परिणाम आहे’. असे कंगनाने म्हटले आणि पुन्हा एकदा फिल्मइंडस्ट्री व काही अभिनेत्रींवर टीका केली. कंगना नेमका कोणाच्या दिशेने इशारा करतेय याचा अंदाज लावणे थोडे कठीण आहे. पण ज्या प्रकारे कंगनाने हे वक्तव्य केले त्याप्रमाणे तिने बॉलिवूडमधील काही मोठ्या अभिनेत्रींना टार्गेट केले आहे. ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले आहेत आणि अजूनही करत आहेत.

हेही पहा –

Prabhas : फौजी सिनेमात प्रभास साकारणार इंग्रज सेनाधिकाऱ्याची भूमिका