Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनKangana Ranaut : द माउंटन स्टोरी- एक प्रेमकथा, व्हॅलेंटाईन्सपासून सुरू होणार कंगनाचा नवा प्रवास

Kangana Ranaut : द माउंटन स्टोरी- एक प्रेमकथा, व्हॅलेंटाईन्सपासून सुरू होणार कंगनाचा नवा प्रवास

Subscribe

अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. विषय सामाजिक असो वा राजकीय ती अत्यंत परखडपणे मत मांडते. म्हणूनच तिला ‘पंगा गर्ल’ अशी ओळख मिळाली. अभिनय, दिग्दर्शन, राजकारण अशा विविध क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर आता कंगना नव्या क्षेत्रात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. माहितीनुसार, अभिनेत्री कंगना रनौत लवकरच हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. याविषयी स्वतः कंगनाने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. (Kangana Ranaut Started her own cafe restaurant)

कंगनाचे हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण

अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या नव्या व्यवसायाची माहिती दिली आहे. त्यानुसार अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशात हे नवं हॉटेल सुरु केलं आहे. ज्याचं नाव ‘द माउंटन स्टोरी’ असे ठेवण्यात आले आहे.

या हॉटेलची खासियत म्हणजे येथे येणाऱ्या खवय्यांना हिमाचल प्रदेशातील विविध पदार्थांच्या चवींचा आस्वाद घेता येणार आहे. कंगनाने ‘द माउंटन स्टोरी’ कॅफे आणि रेस्टॉरंटची एक झलक दाखविणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

द माउंटन स्टोरी – एक प्रेमकथा

या व्हिडीओत सुरुवातीला अभिनेत्री स्वतः बर्फाळ भागातून, मेंढ्यांच्या कळपातून रस्ता काढून हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसतेय. आत गेल्यावर हिमाचल वेशातील दोन कर्मचारी रिसेप्शनला तिचे स्वागत करतात. बाहेर थंडी असताना कॅफेच्या आत उब घेण्यासाठी शेकोटी लावलेली दिसतेय. त्यानंतर काही स्थानिक लोक या हॉटेलमध्ये जेवण करताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर हिमालयातील विविध पारंपारिक पदार्थांची थाळी ठेवली आहे. या व्हिडिओत कंगना टेबल आवरतानासुद्धा दिसतेय.

या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीने म्हटलंय, ‘कॅफे आणि रेस्टॉरंट ‘‘द माउंटन स्टोरी’’ची सुरुवात बालपणीच्या आठवणी आणि आईने बनवलेल्या पदार्थांचा सुगंध यातून प्रेरणा घेऊन केली आहे’. तसेच कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘माझं बालपणीचं स्वप्न सत्यात उतरलं. हिमालयाच्या कुशीत माझा स्वतःचा छोटासा कॅफे – द माउंटन स्टोरी. ही एक प्रेमकथा आहे’.

कधी सुरू होणार?

कंगनाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘द माउंटन स्टोरी’ कॅफे आणि रेस्टॉरंट ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहूर्तावर सुरू होणार असे सांगितले आहे. अर्थात येत्या १४ फेब्रुवारी २०२५ पासून कॅफे आणि रेस्टॉरंट ‘द माउंटन स्टोरी’ खवय्यांच्या सेवेत रुजू होणार आहे. या कॅफेचे बरेच फोटो कंगनाने शेअर केले आहेत.

यातील एका पोस्टसाठी कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘पर्वत शिखर ही अशी जागा आहे, जिथे जीवनाला स्वातंत्र्याचा शुद्ध अर्थ सापडतो’.

तर आणखी एका पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘पर्वत माझी हाडे आणि नद्या माझ्या शिरा आहेत. जंगले माझे विचार आणि तारे माझी स्वप्ने आहेत.’

हेही पहा –