Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ..यामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, राज कुंद्राच्या अटकेनंतर कंगना रणौतचा बॉलिवूडवर...

..यामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, राज कुंद्राच्या अटकेनंतर कंगना रणौतचा बॉलिवूडवर निशाणा

चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोनं नसते - कंगना रणौत

Related Story

- Advertisement -

उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म चित्रीकरण करुन विकल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राची सोमवारी चौकशी केल्यानंतर उशीरा रात्री ११ वाजताच्या सुमारास अटक केली. राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला आहे. राज कुंद्राच्या समर्थनार्थ काही अभिनेत्र्यांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केलं आहे. सतत वादाच्या भोवऱ्यात असलेली अभिनेत्री कंगना रणौतने बॉलिवूडवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याच कारणामुळे फिल्म इंडस्ट्रीला मी गटार बोलते अशी प्रतिक्रिया कंगना रणौतने दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणाौतने राज कुंद्राच्या अटकेनंतर संताप व्यक्त केला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रणौतने बॉलिवूडमधील घराणेशाहीचा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला होता यावेळी कंगनाने अनेक निर्माते, दिग्दर्शक, आणि अभिनेत्यांवर निशाणा साधला होता. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अटकेनंतर पुन्हा बॉलिवूडवर निशाणा साधत टीका केली आहे.

- Advertisement -

अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगना रणौतने म्हटलं आहे की, याचा कारणामुळे मी फिल्म इंडस्ट्रीला गटार बोलते, चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोनं नसते, मी आगामी प्रोजेक्टमध्ये टीकू वेड्स शेरू यामधून बॉलिवूडचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आणणार आहे. असे वक्तव्य कंगना रणौतने सोशल मीडियावर पोस्ट करुन म्हटलं आहे.

राज कुंद्राचे लंडन कनेक्शन

मुंबई गुन्हे शाखेने केलेल्या तपासानुसार असे आढळले की, छोट्या फिल्म, स्टोरीज, छोटे शॉर्ट्स तयार करुन काही वेबसाईट आणि काही मोबाईल अॅप्सला विकल्या जात होत्या, या प्रकरणात राज कुंद्रा यांच्यासह ९ जणांना अटक करण्यात आली आहे. तपासामध्ये निष्पन्न झाले की, उमेश कामत हा राज कुंद्रा यांच्या कंपनीत भारतातील काम पाहायचा त्याचा अधिक तपास केला असता असे कळाले की, राज कुंद्राची विहान नावाची कंपनीचे एका केंब्रिन नावाच्या कंपनीशी व्यवहार होता ही कंपनी लंडनमध्ये आहे. राज कुंद्राच्या बहीणीचा नवरा त्या कंपनीचा मालक आहे. या कंपनीचंच हॉट शॉट नावाचं अॅप आहे. कंपनी लंडनमध्ये असली तरी या अॅपचे सर्व कंटेंट आणि अॅपचा कारभार मुंबईतील विहान कंपनीतून चालत होता. सखोल चौकशीमध्ये राज कुंद्रा आणि त्यांच्या कंपनीबाबत इमेल, वॉट्सअप ग्रुप सापडले आहेत. आर्थिक व्यवहाराची माहिती सापडली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीवर छापा टाकण्यात आला यामध्ये सर्व पुरावे सापडले आहेत. या पुराव्यानुसार राज कुंद्रा आणि त्यांचे आयटी हेड रायन यांना सोमवारी रात्री अटक केली आहे.

- Advertisement -