Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन The Incarnation Sita : मध्ये कंगना साकारणार सीतेची भूमिका

The Incarnation Sita : मध्ये कंगना साकारणार सीतेची भूमिका

Related Story

- Advertisement -

गेल्या अनेक दिवसांपासून केवी विजयेंद्र प्रसाद लिखित आणि आलौकीक देसाई दिग्दर्शित ‘The Incarnation-SITA’ या चित्रपटाची तूफान चर्चा सोशल मीडिया,बॉलिवूडमध्ये(Bollywood) रंगत आहे आणि यसोबत सिनेमात सीताची भूमिका कोण साकारणार असा बहुचर्चीत प्रश्न देखील रंगला आहे. या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी अभिनेत्री करीना कपूरच्या नावाची मध्यंतरी चर्चा झाली होती यानंतर तिने सीतेच्या भूमिकेसाठी तब्बल 12 कोटी रुपये मागितल्याचे सांगितले गेले. आता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या मुख्य भूमिका कोण साकारणार आहे याबाबत माहिती दिली असून कंगना रौनतचे नाव सीतेच्या भूमिकेसाठी कंन्फर्म करण्यात आल्याचे कळतेय.(Kangana Ranaut To Play The Role Of Goddess Sita In Film The Incarnation Sita)

या वृत्ताला दुजोरा देत, एसएस स्टुडिओच्या निर्मात्या, सलोनी शर्मा म्हणाले, “एक महिला म्हणून कंगना रानौतचे चित्रपटात स्वागत करण्यात मला अधिक आनंद होत आहे. ‘द अवतार सीता’ चित्रपटात कंगना एका भारतीय स्त्रीची निर्भय प्रतिमा साकारणार आहे. नुकतच कंगना राणौतनेही या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, ‘सीता रामच्या आशीर्वादाने’ द अवतार सीता ‘चित्रपटात भूमिका मिळाल्याने आणि अतिशय प्रतिभावान टीमसोबत काम करण्यात मला आनंद होत आहे. जय सिया राम ‘

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

- Advertisement -

यापूर्वी चित्रपट कथेचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनीही सांगितले होते की सीता चे पात्र साकारण्यासाठी फक्त आणि फक्त कंगना राणौतचे नाव त्याच्या मनात आहे. या चित्रपटाचे संवाद आणि बोल मनोज मुंटाशीर लिहिलेले असतील. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.
कंगना राणौतबद्दल सांगायचे झाले तर, नुकताच तिचा ‘थलायवी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे ज्यात तिने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे जयललिता यांची भूमिका साकारली होती. आता कंगना रानौत तिच्या ‘धाकड’ आणि ‘तेजस’ या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – कंगनाला होणार अटक?, कोर्टात गैरहजर राहिल्याने संतप्त न्यायाधीशांनी दिला अटकेचा इशारा

- Advertisement -