घरमनोरंजनकंगना रनौत साकारणार नवी भूमिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती

कंगना रनौत साकारणार नवी भूमिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कंगना रनौत वारंवार बॉलिवूड आणि बॉलिवूड कलाकारांवर वादग्रस्त वक्तव्य करत असते. नुकतंच कंगनाला भारतीय जनता पार्टीने हिमाचलच्या निवडणूकीसाठी स्टार प्रचारक बनवलं आहे. दरम्यान, आता कंगना संबंधित आणखी एक बातमी समोर आली आहे. येत्या काळात कंगनाचा नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कंगना रनौत साकारणार ‘ही’ भूमिका

- Advertisement -

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत येत्या काळात तिच्या इमर्जन्सी चित्रपटामध्ये झळकणार आहे. या व्यतिरिक्त कंगानाच्या हाती आणखी एक चित्रपट लागला आहे. यामध्ये कंगना बिनोदिनी दासी यांच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिनोदिनी दासी या बंगालमधील प्रसिद्ध नाटक कलाकार होत्या. कंगनाच्या या चित्रपटाची बातमी कळताच तिचे चाहते खूश झाले आहेत.

कोण होती बिनोदिनी दासी?

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

बिनोदिनी दासी बंगालमधील सुप्रसिद्ध नाटक कलाकार होत्या. त्यांचे नाव क्रांतिकारी अभिनेत्री म्हणून घेतले जाते. मीडिया रिपोट्सनुसार तिने 12 वर्षामध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मिळालेल्या माहितीनुसार, बिनोदिनी दासी एक वेश्येची मुलगी होती. त्यामुळे त्यांचे आयुष्यातील प्रवास खूप कठीण होता.

‘इमर्जन्सी’मध्ये साकारणार इंदिरा गांधींची भूमिका
कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमन हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिका साकारणार आहे.


हेही वाचा :

इफ्फीसाठी निवडलेल्या ‘पल्याड’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -