Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन कंगना रनौत लवकरच सुरू करणार स्वतःचे रेस्टॉरंट

कंगना रनौत लवकरच सुरू करणार स्वतःचे रेस्टॉरंट

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच सामाजिक किंवा राजकिय मुद्दांवर भाष्य करत असते. अनेकदा कंगना बॉलिवूडमधील कलाकारांवर देखील टीका करताना दिसून येते. दरम्यान, सध्या कंगना तिच्या इमर्जन्सी चित्रपटामुळे चर्चेत असून ती दिग्दर्शक, लेखक, अभिनेत्री यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या कंगना सांभळत आहे. अशातच कंगनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक खुलासा केला आहे ज्यामुळे अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

k1skvv2gकंगना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्याबाबत अनेक माहिती चाहत्यांना देत असते. अशातच कंगनाने आणखी एक खुलासा केला आहे. ज्यात तिने एक व्हिडीओ शेअर करत लिहिलंय की, “एक दशकांपूर्वीची आणखी एक मुलाखत, हो मला जेवण बनवायला खूप आवडते… मागच्या वर्षी काही आर्थिक संकटं आली होती नाहीतर मी थंड हवेच्या ठिकाणी स्वतःचे रेस्टॉरंट सुरु करण्यास पूर्ण तयार होते. कदाचित आता ते लवकर होऊ शकतं.”

- Advertisement -

पुढे कंगना म्हणाली की, “या व्हिडीओसाठी माझ्या चाहत्यांचे खूप आभार, मी त्यांना हे सांगायला विसरले होते. पण जेव्हा आपण एखादा निर्धार करतो तेव्हा आपण नियतीचा जीपीएस सेट करतो. त्यामुळे तो निर्धार तयार करा, इच्छा नाही.” सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कंगनाच्या व्हिडीओवर तिचे चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

 


- Advertisement -

हेही वाचा :

करोडपती सलमान राहतो केवळ 1BHKमध्ये… मुकेश छाबरांनी केला खुलासा

- Advertisment -