Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कंगनाची टिव टिव बंद ! कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

कंगनाची टिव टिव बंद ! कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड

माध्यमातून तिने अनेक बड्या लोकांशी पंगे घेतले होते. आता पुढे कंगना ट्विटरने केलेल्या कारवाई वर काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत लाईम लाईट मध्ये असते. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ट्विटरने कंगना रनौतचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केलं आहे. कंगनाच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्विटरने ही कारवाई केली असल्याचे कळत आहे. कंगना तिच्या ट्विटर अकाऊंट वर ट्विट करून अनेक बाबींवर भाष्य करत असे. बॉलिवूड मधील अनेक बड्या व्यक्तींवर तिने ट्विटरच्या माध्यमातून धारेवर धरले होते. तसेच महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यावर,मुख्यमंत्र्यांवर तिने निशाणा साधला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर तिच्या अनेक ट्विट मुळे समाजात तेढ निर्माण झाले होते. आणि याच कारणामुळे कंगनाला बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणून देखील संबोधले जाऊ लागले होते. कंगनाच्या वादग्रस्त ट्विटमुळे लोकांमध्ये हळू हळू रोष प्रकट होऊ लागला होता. आणि हाच परिणाम पाहता ट्विटरने ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

कंगना ट्विटर वर ‘टिम कंगना रनौत’ अश्या यूजरनेमने ट्विट करत असे. नुकतच कंगनाने 3 मिलियन फोलोवर्सचा टप्पा ट्विटरवर गाठला होता. ट्विटर हे कंगनाचे आपला ,मत प्रकट करण्याचे तगडं मध्यम होते. या माध्यमातून तिने अनेक बड्या लोकांशी पंगे घेतले होते. आता पुढे कंगना ट्विटरने केलेल्या कारवाई वर काय बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे हि वाचा – ‘द डर्टी पिच्चर’ भूमिकेसाठी कंगनाचा होता नकार, म्हणाली विद्याप्रमाणे भूमिका साकारणे अवघड

- Advertisement -