घरमनोरंजन'पंगा' घेण्यासाठी कंगना तयार

‘पंगा’ घेण्यासाठी कंगना तयार

Subscribe

कंगना, जस्सी, नैना आणि अश्विनी यांचे काही फोटो पोस्ट करत 'पंगा' चित्रपटाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली आहे. कंगना आता नेहमीप्रमाणेच 'पंगा' घ्यायला तयार झाली आहे असं म्हणावं लागेल.

‘निल बटे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारी दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी लवकरच आपला नवा चित्रपट घेऊन येत आहे. यामध्ये कंगना राणौत, जस्सी गिल आणि नैना गुप्ता यांच्या प्रमुख भूमिका असून याचं नावदेखील निश्चित करण्यात आलं आहे. ‘पंगा’ असं या चित्रपटाचं नाव असून सोमवारीच या नावाची घोषणा करण्यात आली. कंगना, जस्सी, नैना आणि अश्विनी यांचे काही फोटो पोस्ट करत या नावाची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली असून कंगना आता नेहमीप्रमाणेच ‘पंगा’ घ्यायला तयार झाली आहे असं म्हणावं लागेल. ‘तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर असेल तर जगातील कोणताही व्यक्ती तुमच्याबरोबर पंगा घेऊ शकत नाही,’ असं या चित्रपटाच्या फोटोमध्ये म्हणण्यात आलं आहे.

कबड्डी या खेळावर आधारित आहे ‘पंगा’

लवकरच कंगना या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. कबड्डी या खेळावर या चित्रपटाची कथा असल्याचं सध्या म्हटलं जात आहे. त्यामुळंच या चित्रपटाचं नाव ‘पंगा’ ठेवण्यात आलं आहे. दरम्यान उत्तर भारतातील वातावरणामध्ये ही कथा घडल्याचं दाखवण्यात येणार आहे. यामध्ये कंगनाची मुख्य भूमिका आहे. दरम्यान या चित्रपटासाठी कंगना १५ दिवस एक वर्कशॉप केल्यानंतरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याची माहिती आहे. कबड्डीपटूची भूमिका कंगना साकारणार असून तिला कबड्डी या खेळाबद्दल पूर्ण माहिती करून देण्यात येणार आहे.

- Advertisement -

चित्रपटासाठी घेणार योगाचा आधार

या चित्रपटासाठी कंगना विशिष्ट मेहनत घेणार असून, कबड्डीचा अभ्यास करतानाच योगाचादेखील आधार घेणार आहे. कबड्डी खेळताना श्वासावर नियंत्रण लागतं त्यासाठी योगामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणात त्याचा अधिक फायदा होईल असं कंगनाला वाटत आहे. तसंच कंगनाला प्रशिक्षण देण्यासाठी खऱ्या कबड्डी खेळाडूला नेमण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारीनं सांगितलं आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कंगनाला आपल्या शरीरयष्टीमध्ये बराच बदल करावा लागणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण ऑगस्टनंतर सुरु होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -