Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन चक्क कंगनाने केलं शाहरुखच्या 'जवान' चित्रपटाचं कौतुक

चक्क कंगनाने केलं शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचं कौतुक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांसह सेलिब्रिटींचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच अभिनेत्री कंगना रनौतने देखील शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे. कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने चक्क शाहरुख खानला चित्रपटाचा देव म्हटलं आहे. यासोबतच कंगनाने ‘जवान’च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.

कंगनाने केलं शाहरुखचे कौतुक

- Advertisement -

कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘जवान’ची पोस्ट शेअर करत शाहरुखचे खूप कौतुक केले आहे. या स्टोरीमध्ये कंगनाने लिहिलंय की, “90 च्या दशकात प्रियकराची भूमिका साकारण्यापासून ते प्रेक्षकांशी तेच नाते पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रदीर्घ संघर्ष, अखेरीस वयाच्या 60 व्या वर्षी भारतीय सुपरहिरो म्हणून उदयास येत आहे. नायक वास्तविक जीवनात मेगास्टार होण्यापेक्षा कमी नसतो. लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्या निवडीची खिल्ली उडवली, तरीही त्याच्या दीर्घ कारकिर्दीची वाट पाहणाऱ्या सर्व सहकारी कलाकारांसाठी त्याचा संघर्ष एक मास्टर क्लास आहे.”

या पुढे कंगनाने लिहिलंय की, “शाहरुख खान हा चित्रपटाचा देव आहे. एक देव ज्याची चित्रपटाला फक्त त्याची मिठी आणि डिंपल्सच नाही तर काही गंभीर जग वाचवणाऱ्या कृपेची देखील गरज आहे. तुझ्या चिकाटीला, मेहनतीला आणि नम्रतेला सलाम, किंग खान.” असं कंगनाने लिहिलं आहे.


हेही वाचा :

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा करणार लग्न?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -