घरमनोरंजन‘kanyadaan’ ad : वस्तु विकण्यासाठी धर्माचा वापर बंद कर, कंगना आलियावर भडकली

‘kanyadaan’ ad : वस्तु विकण्यासाठी धर्माचा वापर बंद कर, कंगना आलियावर भडकली

Subscribe

बॉलिवूडची (bollywood)पंगा क्विन कंगना रनौत(kangana Ranaut) नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. राजकारणी मंडळीसह सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांवर कंगना बिंदास्तपणे हल्लाबोल करते. आता कंगनाच्या रडारावर अभिनेत्री आलिया भट्ट(Alia bhatt)आली आहे. नुकतच आलियाने हिंदू संस्कृतीत विवाहादरम्यान होणाऱ्या कन्यादान या प्रथेवर एका जाहिरातीमध्ये भाष्य केलं आहे. यामुळे आलियाला नेटकऱ्यांसह कंगनाच्याही टिकेचा सामना करावा लागत आहे.(Kangana targets Alia for appearing in ad)

कंगनाने इंस्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत आलिया भट्टला आणि मोहे या कपड्यांच्या ब्रँण्डला  टॅग करत जाहिरातीच्या संकल्पनेवर सवाल उठवला आहे. कंगना म्हणाली, या जाहिरातीचा उद्धेश तुमच्या नफ्यासह ग्राहकांसोबत धर्म आणि अल्पसंख्य-बहुसंख्याचे राजकारण करुन त्यांच्यामध्ये फूट पाडणे हा आहे. हे अयोग्य आहे. सगळ्या ब्रँड्सना विनंती करते की घर्म, माइनॉरिटी,मेजॉरिटी पॉलिटिक्सला या सगळ्यामध्ये ओढू नका, या जाहिरातीद्वारे साध्या-भोळ्या जनतेमध्ये, ग्राहकांमध्ये फूट पाडण्यात येत आहे. त्यांना भडकवण्यात येतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

- Advertisement -

 

- Advertisement -
नेमकं काय दाखवलंय जाहिरातीमध्ये

आलियाची ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत असून या जाहिरातीमध्ये आलिया नववधूच्या पेहरावात लग्न मंडपात दिसत आहे. यावेळी संभाषणा दरम्यान आलिया बोलते की, तिच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तिच्यावर खूप प्रेम करतात. मात्र मुलीला परक्या घराचे धन का मानले जाते?, मुलगी ही दान करण्याची गोष्ट नाही. यामुळे मला हे कन्यादान अमान्य आहे. कन्यादान नाही कन्यामान करा असा संदेश आलिया व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करत आहे. मोहे फॅशन यांनी त्यांच्या अधीकृत सोशल मीडिया अकांऊटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओ पाहा –

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohey (@moheyfashion)

आलिया भट्टचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत अनेक लोकांनी पाहिला तिचे कौतुक देखील झाले. मात्र यासह अनेकांना तिची ही कल्पना फारसी रुचली नाही. आलियाने हिंदू धर्माचा अपमान केल्याची टीका नेटकऱ्यांनी केली आहे.


हे हि वाचा – आलियाने ‘कन्यादान’ प्रथेवर केले भाष्य, हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याने नेटकरी संतापले

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -