घरमनोरंजनसिद्धार्थ-कियाराचं कौतुक करत कंगनाने मारला बॉलिवूडला टोमणा

सिद्धार्थ-कियाराचं कौतुक करत कंगनाने मारला बॉलिवूडला टोमणा

Subscribe

बॉलिवूड मधील सर्वात क्यूट कपल सिद्धार्थ आणि कियारा काल (7 फेब्रुवारी) अखेर विवाहबंधनात अडकले. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. राजस्थानातील जैसमलेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये या दोघांनी आयुष्यभरासाठी लग्नगाठ बांधली. कुटुंब, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने दोघांनी आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाचे फोटोपाहून चाहत्यांसह, बॉलिवूड कलाकार देखील त्यांना शुभेच्छा देऊ लागले आहेत. आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ, रश्मिका मंदाना, श्रद्धा कपूर अशा बऱ्याच कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अशातच आता कंगना रनौतने देखील या जोडीला शुभेच्छा देत बॉलिवूडला टोमना मारला आहे.

कंगनाने केलं सिद्धार्थ-कियाराचं कौतुक

- Advertisement -

एका ऑफिशियल ट्वीटर अकाऊंटवर सिद्धार्थ-कियाराचा फोटो शेअर करत अनिरुद्ध गुहा नावाच्या व्यक्तीने ते डेट
करत होते? असा प्रश्न ट्वीट केला. त्यावर कंगनाने प्रतिक्रिया देत लिहिलंय की, “हो, ते कोणत्याही ब्राँड आणि चित्रपटाचं प्रमोशन करत नव्हते. त्यांनी कधी लॉमलाईटमध्ये राहण्यासाठी बॉलिवूड रिलेशनशिप नौटंकीच्या मागणीवर लक्ष नाही दिलं…. इतकं ईमानदार आणि खरं प्रेम आहे. डिलाईटफुल कपल.” असं म्हणत कंगनाने या जोडीचं कौतुक केलंय.

- Advertisement -

दरम्यान, या आधी देखील कंगनाने या दोघांचा फोटो इंस्टाग्रामला शेअर करत त्यांचं कौतुक केलं होतं. त्यावेळी ती म्हणाली होती की, “हे कपल किती सुंदर आहे, इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांसोबत खरं प्रेम खूप कमी पाहायला मिळतं. ही जोडी एकत्र खूप छान वाटते.”


हेही वाचा : 

“त्यांना एकत्र पाहणं परिकथेसारखं”; करण जौहरची कियारा-सिद्धार्थसाठी खास पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -