Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन शॉर्ट्स घालून शिव मंदिरात गेलेल्या मुलीची कंगनाने घेतली शाळा

शॉर्ट्स घालून शिव मंदिरात गेलेल्या मुलीची कंगनाने घेतली शाळा

Subscribe

बॉलिवूडची धाकड गर्ल कंगना रनौत नेहमीच सामाजिक किंवा राजकीय मुद्दांवर भाष्य करत असते. अनेकदा कंगना बॉलिवूडमधील कलाकारांवर देखील टीका करताना दिसून येते. दरम्यान, अशातच कंगना आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. खरंतर, एक मुलगी हिमाचल येथील शिव मंदिरामध्ये शॉर्ट्स घालून गेली होती. जिचा फोटो ट्वीटरवर शेअर करत कंगनाने त्या मुलीची शाळा घेतली आहे.

ट्वीटरवर एका युजरने एक फोटो शेअर केला होता ज्यात एक मुलगी हिमाचल येथील बैजनाथ मंदिरामध्ये शॉर्ट्स घालून गेली आहे. त्या युजरने मुलीच्या फोटोसोबत लिहिलं होतं की, “बैजनाथ मंदिरामध्ये गेली आहे की कोणत्या नाईटक्लबमध्ये? अशा लोकांना मंदिरात प्रवेश करण्यास नकार द्यायला हवा. याचा मी तीव्र निषेध करतो. हे सगळे वाचून तुम्हाला जर माझे विचार खराब वाटत असतील तरीही मला चालेल” असं त्या युजरने लिहिलं आहे.

- Advertisement -

याच ट्टीटला रिट्वीट करत कंगनाने लिहिलंय की, “हे वेस्टर्न कपडे आहेत. ज्यांना इंग्रजांनी बनवलं आणि प्रमोट केलं. एकदा मी व्हॅटिकनमध्ये होतो आणि मी शॉर्ट्स, टी-शर्ट घातले होते. मला कॅम्पसमध्येही प्रवेश दिला जात नव्हता. मला हॉटेलमध्ये जाऊन चेंज करावी लागली. रात्रीचे कपडे घातलेले हे कॅज्युअल आळशी आणि मूर्ख असतात. मला वाटत नाही तिचा दुसरा काही हेतू असेल पण अशा मूर्खांसाठी कडक नियम असायला हवेत.” असं कंगना म्हणाली.

दरम्यान, कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा :

‘सत्यप्रेम की कथा’मधील पहिल्या गाण्याचा टीझर आऊट

- Advertisment -