Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कंगना 'टिकू वेड्स शेरु' चित्रपटातून करणार डिजीटल विश्वात पदार्पण

कंगना ‘टिकू वेड्स शेरु’ चित्रपटातून करणार डिजीटल विश्वात पदार्पण

येत्या काळात कंगना अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड क्वीन कंगना रनावतने तिच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर दिली आहे. कंगना लवकरच एक नवीन चित्रपट प्रेक्षकांसाठी घेवून येत आहे. ‘टिकू वेड्स शेरु’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. विशेष म्हणजे कंगना स्वत: या चित्रपटाची निर्मिती करणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून कंगना डिजीटल विश्वात पदार्पण करणार आहे. शनिवारी कंगनाच्या प्रॉडक्शन हाऊस ‘मणिकर्णिका फिल्म’चा लोगोही लॉन्च करण्यात आला. तिने तिच्या ट्विटरवर हा लोगो शेअर करत ही माहिती दिली आहे. ” मणिकर्णिका फिल्म्सचा लोगो लॉन्च करण्यात आलाय. यासोबतच ‘टिकू वेड्स शेरु’ ही या लव्ह स्टोरीतून आम्ही डिजीटल विश्वात पदार्पण करत आहोत. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे.” असे ट्विट कंगनाने शेअर केले आहे.

 येत्या काळात कंगना अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. सध्या ती धाकड, तेजस आणि मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा या चित्रपटांवर काम करत आहे. त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून कंगना सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय आहे. सोशल मिडियावर देशातील घडामोडींवर ती नेहमी परखड मत मांडतानाही दिसते. कंगनाला कित्येकदा तिच्या या बेधडक वक्तव्यामुळे ट्रोलही केले जाते.


- Advertisement -

हे वाचा-  New Heart Breaksong:‘वफा ना रास आयी’ गाणं प्रदर्शित!

- Advertisement -