कंगना घेणार मुख्यमंत्री शिंदेंची भेट; राजकारणात प्रवेश करणार का?

पण ही भेट नक्की किती वाजता होणार याबाबत कोणतेही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान अभिनेत्री कंगनाने आतपर्यंत अनेकदा शिवसेनवर टीका केली होती. त्या संदर्भांत ती अनेकदा माध्यमांद्वारे बोलली आहे. त्यांनतर एकनाथ शिंदे राजचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कंगनाने त्यांचे अभिनंद सुद्धा केले होते.

बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री कंगना ही नेहमीच काही न काही कारणांमुळे सतत चर्चेत असते. कंगना तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. त्याचबबरोबर कंगना राज्यातील आणि देशातील वेगवगेळ्या राजकीय विषयांवर स्वतःचं स्पष्ट मत मांडत असते. सोशल मीडियावरसुद्धा कंगना पोस्ट शेअर करत चर्चेत असते. कंगना आता लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याचं म्हटलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कंगना भेट घेणार आहे.

हे ही वाचा – वेब सीरिजमधून भारतीय सैनिकांचा अपमान केल्याच्या प्रकरणात एकता कपूरविरोधात गुन्हा दाखल

शनिवार 1 ऑक्टोबर रोजी अभिनेत्री कंगना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय निवासस्थान वर्षा येथे भेट घेणारा आहे. पण ही भेट नक्की किती वाजता होणार याबाबत कोणतेही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान अभिनेत्री कंगनाने आतपर्यंत अनेकदा शिवसेनवर टीका केली होती. त्या संदर्भांत ती अनेकदा माध्यमांद्वारे बोलली आहे. मुख्य म्हणेज सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणातसुद्धा कंगनाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला होता. त्यांनतर एकनाथ शिंदे राजचे मुख्यमंत्री झाल्यानंतर कंगनाने त्यांचे अभिनंद सुद्धा केले होते.

याच संदर्भांत कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीसुद्धा शेअर केली होती. त्यात तिने एकनाथ शिंदेचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला तिने हटके कॅप्शनसीवुद्धा दिले होते. ”यशाची किती प्रेरणादायी कहाणी आहे…, ऑटो रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत… अभिनंदन सर”, अशा आशयाची पोस्ट कंगनाने शेअर केली होतो.

हे ही वाचा – अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं ऐकलंत का? शंकर महादेवन यांनी दिलीय साथ