घरमनोरंजनट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली सुदैवाने माझ्याकडे...

ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली सुदैवाने माझ्याकडे…

Subscribe

"माझं मन देशातील त्या लोकांसाठी दुःखी आहे, ज्या लोकांवर अत्याचार होतात आणि ते दडपले जातात, त्यांना गुलाम म्हणून ठेवले जाते आणि ज्यांची अभिव्यक्ती दाबून टाकील आहे.

‘बॉलिवूड क्विन’ कंगना रनौत सोशलल मीडियावर नेहमीच बेधडकपणे आपले वक्तव्य मांडत असते. मात्र तिने केलेल्या प्रतिक्रिया या तिला नेहमी महागात पडत असतात. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिला टिकेचा भागीदार व्हावे लागते. नुकतच कंगनाने बंगलमध्ये झालेल्या विधानसभा निवडनुकीत तृणमूल कॉग्रेसच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारावरुन चार जाणांचे मृत्यू झाले. यावर पंग़ा गर्ल कंगनाने स्वत:च्या ट्विटरवरुन ‘हिंसाचार करणाऱ्यांना हिंसाचारातून उत्तर द्यायला हवं’ असे धक्कादायक विधान केले होते. मात्र हे विधान चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह असल्याने ट्विटरने कंगनाचे ट्विटर निलंबित केले. यावर आता कंगनाची सणसणीत प्रतिक्रिया आली आहे. कंगनाने लेखी निवेदनाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”ट्विटरने पुन्हा सिद्ध केलं आहे की, ते अमेरिकन आहेत आणि अमेरिकन लोक काळ्या लोकांना गुलाम बनवण्याचा मानसिकतेला जन्माला आले आहेत. ते ठरवतात की आपण काय विचार करावा, काय बोलावे किंवा काय करावे. सुदैवाने माझ्याकडे आणखी काही प्लॅटफॉर्म आहेत, ज्याद्वारे मी आवाज उठवू शकते आणि माझ्या सिनेमाबद्दल बोलू शकते.” असे म्हणत कंगनाची संतपजनक प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

कंगना पुढे म्हणाली, की “माझं मन देशातील त्या लोकांसाठी दुःखी आहे, ज्या लोकांवर अत्याचार होतात आणि ते दडपले जातात, त्यांना गुलाम म्हणून ठेवले जाते आणि ज्यांची अभिव्यक्ती दाबून टाकील आहे. एवढे असूनही त्यांच्या दु: खाचा अंत नाही.” अशा प्रकारची प्रतिक्रियाकरत कंगनाने ट्विटरने तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंड केल्याबाबत मत व्यक्त केले आहे.

- Advertisement -

हे वाचा-  ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ साठी डिजिटल ऑडिशन्स लवकरच…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -