फिल्मफेअरवर केलेल्या खोट्या आरोपानंतर कंगनाचे नामांकन रद्द

नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंगनाने फिल्मफेअरवर तक्रार दाखल करण्याबाबत एक स्टोरी शेअर केली होती. जे वाचून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले होता.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या धाकड अंदाजांमुळे वारंवार चर्चेत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंगना रनौतला बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या फिल्मफेअर अर्वार्डसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले होते. हे नामांकन कंगनाला तिच्या ‘थलाइवी’ चित्रपटासाठी मिळाले होते. मात्र यामुळे कंगना भडकली आणि तिने फिल्मफेअरवर तक्रार दाखल केली. अशातचं आता फिल्मफेअरने सुद्धा कंगनाला आपलं उत्तर पाठवलं आहे. तसेच कंगनाने केलेले आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.

फिल्मफेअरने दिलं कंगनाला उत्तर
फिल्मफेअर असोसिएशनने कंगना रनौतला पाठवलेला मॅसेज शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, हॅलो कंगना फिल्मफेअर अर्वार्डमध्ये नामांकित झाल्याबद्दल खूप शुभेच्छा. 30 ऑगस्ट रोजी जिओ कन्वेंशन सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये तुमचे स्वागत आहे. कृपया तुम्ही उपस्थितीबाबत सांगा, म्हणजे तुमच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात येईल. कृपया तुमच्या घरचा पत्ता पाठवा म्हणजे आम्ही तुम्हाला आमंत्रण पाठवू. फिल्मफेअरने हे पत्र शेअर करत स्पष्ट सांगितले आहे की, त्यांनी कंगानाला अवॉर्ड फंक्शनमध्ये अवॉर्ड देण्यासाठी किंवा परफॉर्मन्स करण्यासाठी कुठेही सांगितले नाही. कंगनाचे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. तसेच कंगनाच्या या गैरवर्तवणूकीमुळे फिल्मफेअरने कंगनाचे नॉमिनेशन मागे घेतले आहे.

कंगनाने केले होते हे आरोप
नुकत्याच काही दिवसांपूर्वी कंगनाने फिल्मफेअरवर तक्रार दाखल करण्याबाबत एक स्टोरी शेअर केली होती. जे वाचून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले होता. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं की, तिने 2014 पासूनचं फिल्मफेअरवर बंदी घातली आहे. मी 2014 पासून फिल्मफेअर सारख्या, अनैतिक, भ्रष्टसारख्या चूकिच्या गोष्टींपासून लांब आहे. परंतु, मला यावर्षी पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक फोन आले. ते मला ‘थलाइवी’ साठी पुरस्कार देऊ इच्छितात. पंरतु मला अशाप्रकारच्या भ्रष्टाचाराला चालना द्यायची नाही.


हेही वाचा  :बिग बॉस फेम विशाल निकमचा नवा म्युझिक अल्बम ‘तू संग मेरे’ लवकरच भेटीला