Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन मला 25 पेक्षा जास्त ब्रँड्स एंडोर्समेंटमधून काढले कारण... कंगनाची पोस्ट चर्चेत

मला 25 पेक्षा जास्त ब्रँड्स एंडोर्समेंटमधून काढले कारण… कंगनाची पोस्ट चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकताच कंगनाने एक खुलासा केला आहे की, ती राजकारणी, देशाद्रोही आणि तुकडे-तुकडे गँगच्या विरोधात बोलते म्हणून तिला 25 हून अधिक ब्रँड एंडोर्समेंटमधून काढून टाकण्यात आले होते. ज्यामुळे तिला दरवर्षी 30 ते 40 कोटींचे नुकसान झाले. याबाबत खुलासा करत कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एलन मस्कचा एक इंटरव्यू शेअर केला आहे.

कंगनाची पोस्ट चर्चेत

- Advertisement -

कंगनाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एलन मस्क सांगत आहेत की, माझ्या जे मनात येईल ते मी बोलेन, मग याच्या परिणामामध्ये आर्थिक नुकसान भोगावे लागले तरी चालेल.” या व्हिडीओला शेअर करत कंगना रनौतने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “स्वातंत्र्य आणि यशाचे हेच खरे पात्र आहे. हिंदुत्वासाठी बोलणं, राजकारणी, देशविरोधी, तुकडे-तुकडे गँग विरोधात वक्तव्य करण्याचे मला खूप नुकसान झाले आहे. मला 25 हून अधिक ब्रँड एंडोर्समेंटमधून काढून टाकण्यात आले. त्यांनी मला रातोरात काढून टाकलं. यामुळे मला प्रत्येकवर्षी 30-40 कोटींचे नुकसान झाले. परंतु मी आझाद आहे आणि मला काहीही बोलण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. विशेषत: या अजेंड्यावर चालणाऱ्या MNCs आणि कॉर्पोरेट ब्रँडचाही तिरस्कार नाही. भारताची संस्कृती आणि अखंडता.”

याशिवाय कंगना रानौत पुढे म्हणाली, “मी एलनचे कौतुक करते कारण प्रत्येकजण फक्त कमकुवतपणा दाखवतो, किमान श्रीमंत व्यक्तीने पैशाची पर्वा करू नये.” कंगना राणौतची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा :

होय, मी ब्रिटनच्या पंतप्रधानांची सासू आहे; सुधा मुर्तींनी सांगितला ‘तो’ किस्सा

- Advertisment -