इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगनाचा जबरदस्त लूक; ‘इमरजेंसी’चा टीझर रिलीज

इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या चित्रपटाचं नाव 'इमरजेंसी' असून नुकताच कंगनाने या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे

‘धाकड’ चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने आता तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. याआधी झाशीच्या राणीची दमदार भूमिका साकारणारी कंगना आता लवकरच देशातील सर्वात शक्तीशाली महिला असलेल्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. कंगनाने नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

कंगना रनौत नेहमीच तिच्या अभिनयाने चाहत्यांचं मन जिंकत असते. गेल्या अनेक दिवसापासून तिचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. इंदिरा गांधी यांच्यावर आधारित या चित्रपटाचं नाव ‘इमरजेंसी’ असून नुकताच कंगनाने या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या टीझरखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की, ‘Her’ who was called ‘Sir’ असं लिहिलं आहे. तसेच या टीझरमध्ये इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणारी कंगना रनौत अमेरिकाच्या राष्ट्रपतींना एक मॅसेज द्यायला सांगते की, त्यांच्या कार्यालयात त्यांना कोणी मॅडम नाही ‘सर’ म्हटलं जातं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

या चित्रपटात कंगना रनौतचा लूक, आवाज तसेच चेहऱ्यावरील हावभाव बऱ्यापैकी इंदिरा गांधी यांच्या सारखे जुळून आले आहेत. या चित्रपटाचा टीझर पाहून युजर्स कंगनाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. शिवाय काहीजण तर कंगना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावेल असं देखील म्हणत आहेत.

‘धाकड’ झाला फ्लॉप
मागील काही दिवसांपूर्वी कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. कंगनाच्या ‘इमरजेंसी’ चित्रपटानंतर काहीच दिवसात तिचा ‘तेजस’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :देवदासला २० वर्षे पूर्ण! चित्रपटाचं बजेट ५० कोटीपर्यंत गेल्याने निर्मात्याला झाली होती अटक