Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कंगनाकडून तापसी पुन्हा लक्ष्य, म्हणाली 'she-man', नेटीजन्स भडकले

कंगनाकडून तापसी पुन्हा लक्ष्य, म्हणाली ‘she-man’, नेटीजन्स भडकले

कंगना आणि तापसी पन्नू या दोन्ही अभिनेत्रीचं ट्विटर वॉर  सर्वश्रूत असून आता कंगनाने केलेल्या ट्विट वर अभिनेत्री तापसी पन्नूने कोणतेही उत्तर दिले नाहीये.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची  पंगा क्वीन कंगना रनौत पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे चर्चेत आली आहे. कंगनाचं ट्विटर वॉर काही थांबण्याच नाव घेत नाहीये . कंगनाने अभिनेत्री तापसी पन्नू वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ट्विटरवर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्ट मध्ये तापसी पन्नू वर टीका करण्यात आली असून तापसीला अभिनेत्री कंगना रनौतची स्वस्त कॉपी आहे असे बोलण्यात आले आहे. आणि याच ट्विटला उत्तर देतांना कंगनाने तपसी चा उल्लेख ”She-man आज खूप खुश असेल” आणि त्यावर स्माइल करणारा इमोजीही टाकला आहे.

- Advertisement -

कंगनाच्या  वक्तव्यानंतर नेटकर्‍यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी कंगनाला धारेवर धरलं आहे. काही यूजर्सने तुझ्याकडून अशा वागणुकीची अपेक्षा नसल्याचे ट्विट करत कंगनावर नाराजी व्यक्त केली आहे. नेटकर्‍यांच्या ट्विट नंतर कंगनाने आपली बाजू मांडत आणखीन एक ट्विट करत नेटकर्‍यांना उत्तर दिलं आहे. कंगनाने ट्विट करून म्हंटल आहे की,” She-man असणं काही चुकीचं आहे का? मला असं वाटतंय की तापसीच्या मजबूत लूकची ही स्तुती आहे, तुम्ही नकारात्मक विचार का करताय हे मला समजत नाही.”

- Advertisement -

कंगना आणि तापसी पन्नू या दोन्ही अभिनेत्रीचं ट्विटर वॉर  सर्वश्रूत असून आता कंगनाने केलेल्या ट्विट वर अभिनेत्री तापसी पन्नूने कोणतेही उत्तर दिले नाहीये. मात्र कंगनाने आपल्या ट्विट वरुन तिझ्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेतल्याचे दिसत आहे.


हे हि वाचा – लसीची वाढती किंमत विचारताच, फरहान अख्तर झाला ट्रोल

- Advertisement -