वेदपुराणांच्या प्रेरणेतून एवेजंर्सची निर्मिती, थॉर आहे हनुमानची कॉपी, तर आर्यन मॅन म्हणजे कर्ण- कंगणाचा अजब दावा

सुपरहीट फैंचाईज एवेंजर्स (Avengers)आणि हॉलीवबडमधील  सुपरहीरोंवर आधारित चित्रपटांविषयी विचारण्यात आले. यावर कंगणाने जे काही उत्तर दिले ते ऐकूण मीडियाच नाही तर तेथे उभा असलेला सामान्य नागरिकही हैराण झाला.

Kangna Ranaut on Hijab Row he said If you want to show courage, show it without wearing burqua in Afghanistan

बॉलीवूड क्वीन कंगणा रणावत आणि वाद यांच अतूट नात आहे. कंगणाला कधीही कोणत्याही आणि कुठेही कशावरही प्रश्न विचारा तिच्याकडे त्याचे उत्तर तयारच असते. याचपार्श्वभूमीवर नुकतच कंगणाला मार्वल स्टुडीयोजच्या सुपरहीट फैंचाईज एवेंजर्स (Avengers)आणि हॉलीवबडमधील  सुपरहीरोंवर आधारित चित्रपटांविषयी विचारण्यात आले. यावर कंगणाने जे काही उत्तर दिले ते ऐकूण मीडियाच नाही तर तेथे उभा असलेला सामान्य नागरिकही हैराण झाला. कंगणाने म्हटले की सुपरहीरोच्या चित्रपटातील पात्र हे आपल्या महाभारत आणि वेदपुराणातील पात्रांपासून प्रेरित होऊन बनवण्यात आली आहेत.

तसेच यावेळी कंगणाने थॉरची तुलना थेट हनुमानाबरोबर आणि आर्यन मॅन हा महाभारतातील कर्णच असल्याचे म्हटले आहे. कंगणाने ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे.  मुलाखतीत कंगणाने आपल्या खासगीसह प्रोफेशनल लाईफवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. या चित्रपटात कंगणा एका हेराच्या भमिकेत दिसणार आहे. सध्या कंगणा तिच्या धाकट चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. हा चित्रपट २० मे रोजी रिलिज होत आहे. या  यादरम्यान कंगणाला सुपरहिरोंच्या चित्रपटात काम करायचे असल्यास कोणत्या भारतीय पौराणिक कथांमधील कोणते पात्र निवडाल असा प्रश्न विचारला त्यावेळी तिने अशा भूमिकांसाठी विचारणा झाल्यास आपण भारतीय पौराणिक कथेतील पात्रांचा विचार करणार असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर हॉलीवूड भारतीय पुराण आणि वेदांवर आधारित पात्रांचाच उपयोग सुपरहिरो चित्रपटात करत असल्याचाचा दावा तिने केला.

तसेच एवेंजर्सची निर्मिती ही आपल्या महाभारतावरून प्रेरणा घेऊनच तयार करण्यात आली असावी असेही कंगणाने सांगितले. त्याचबरोबर त्यांचा आर्यमॅनची निर्मिती ही कर्णावरून प्रेरित झाल्याचे तिने सांगितले.