जय हो! झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने कंगनाचा आनंद गगनात मावेना

स्वत:ला देशभक्त म्हणवणाऱ्या कंगनाने या निमित्त पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले

kangna reaction on rename of jhansi railway station to veerangana laxmibai railway station
kangna reaction on rename of jhansi railway station to veerangana laxmibai railway station

उत्तर प्रदेशमधील झाशी रेल्वे स्थानकाच्या नामांतराला बुधवारी यूपी सरकारने मंजूरी दिली. त्यानंतर आता झाशी रेल्वे स्थानकाचे नामांतर वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. योगी सरकारच्या या निर्णयाचा अभिनेत्री कंगनाला मात्र फार आनंद झाला आहे. कंगनाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर ‘जय हो’ असे म्हणत आनंद व्यक्त केलाय.

कंगनाने इन्स्टाग्रामवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विट शेअर केले आहे. ज्यात झाशी रेल्वे स्थानक आता वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जाईल असे म्हटले आहे योगींचे हा ट्विट शेअर करत कंगनाने वीरांगणा राणी लक्ष्मीबाईचा विजय असो असे म्हटले आहे. पुढच्या स्टोरीमध्ये कंगनाने योगी सरकारने घेतलेला ग्रेट निर्णय असे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे.

स्वत:ला देशभक्त म्हणवणाऱ्या कंगनाने या निमित्त पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कंगनाने मणिकर्णिका द क्विन ऑफ झाशी या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची प्रमुख भूमिका बजावली होती. त्यामुळे कंगनाचे देशप्रेम आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावरचे प्रेम ती दाखवून देताना दिसत आहे.

झाशी रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याचा प्रस्ताव मागच्या तीन महिन्यांपासून गृहमंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. अखेर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिल्याने झाशी रेल्वे स्थानकाचे नाव आता वीरांगणा लक्ष्मीबाई रेल्वे स्थानक असे ठेवण्यात आले आहे.


हेही वाचा – ‘मणिकर्णिका’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही तर …. – कंगना रणौत