घरताज्या घडामोडीSanchari Vijay Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय यांचे रस्ते अपघातात निधन

Sanchari Vijay Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय यांचे रस्ते अपघातात निधन

Subscribe

राष्ट्रीय पुरस्कार विजयी कन्नड अभिनेते संचारी विजय (Sanchari Vijay) यांचे आज, सोमवारी निधन झाले आहे. ३७ वर्षी विजय यांचा शनिवारी रात्री बंगळुरू जवळ अपघात (sanchari vijay accident) झाला होता. या अपघातामध्ये विजय यांना गंभीर दुखापत झाली होती. ज्यानंतर उपचारादरम्यान संचारी विजय यांचा मृत्यू (Sanchari Vijay Death) झाला. संचारी विजय यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याच्या मेंदू मृत झाल्याची घोषणा केली, ज्यानंतर विजय यांच्या कुटुंबियांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

विजय यांचा भाऊ सिद्धेशने सांगितले की, ‘विजय यांच्या मेंदूने काम करणे बंद केले होते, त्यामुळे आम्ही त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. संचारी विजय नेहमी समाजसेवा करण्यावर विश्वास ठेवत होते आणि यामुळे आम्ही त्यांचे अवयव दान केले आहे.’

- Advertisement -

संचारी विजय यांचा असा झाला अपघात?

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी संचारी विजय यांचा अपघात झाला. दुचाकीवर विजय मागे बसले होते आणि रस्ता ओला असल्यामुळे दुचाकी घसरली. विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, ज्यानंतर त्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली.

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘नानू अवनाल्ला अवालू’ या चित्रपटातून संचारी विजय यांनी आपल्या दमदार भूमिकेमुळे लोकप्रिय झाले होते. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. लॉकडाऊनमध्ये संचारी विजय यांनी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची मदत केली होती. संचारी विजय यांचे निधन झाल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -