घरमनोरंजनभाग्याच्या देवीबाबत केलेल्या वक्तव्यावर कन्नड अभिनेत्याच्या तोंडावर चाहत्याने फेकली चप्पल; व्हिडीओ व्हायरल

भाग्याच्या देवीबाबत केलेल्या वक्तव्यावर कन्नड अभिनेत्याच्या तोंडावर चाहत्याने फेकली चप्पल; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा या कलाकारांना त्यांच्या चाहत्यांच्या रागाला देखील सामोरे जावे लागते. अशीच एक घटना कन्नड अभिनेत्यासोबत घडली आहे. कन्नड अभिनेता दर्शनने काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं जे प्रचंड चर्चेत आलं शिवाय त्यावर अनेकांना त्याला ट्रोल देखील केलं. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये त्याच्या तोंडावर चप्पल फेकून मारण्यात आली.

तोंडावर चप्पल फेकून चाहत्याने केला राग व्यक्त
या वर्षी अनेक कलाकारांना त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चाहत्यांच्या रागाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, आता यात कन्नड अभिनेता दर्शनचं देखील नाव जोडलं गेलं आहे. दर्शन सध्या त्याच्या आगामी क्रांती चित्रपटामुळे चर्चेत आहे. याचं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो एका ठिकाणी पोहोचला होतो. त्यावेळी अचानक चाहत्यांच्या गर्दीतून स्टेजवर दर्शनच्या तोंडावर चप्पल फेकण्यात आली.

- Advertisement -

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कन्नड अभिनेत्री रचिता राम चाहत्यांना संबोधित करत होती. त्यावेळी खालून स्टेजवर दर्शनच्या तोंडावर चप्पल फेकून मारण्यात आली. हा प्रकार पाहून सर्वचजण काही क्षण आश्चर्यचकित झाले. यावेळी दर्शन नक्की काय म्हणेल याकडे सर्वांचेच लक्ष होते मात्र तो “चूकी नाही भाऊ, ठीक आहे.” असं म्हणाला. त्यानंतर तो संपूर्ण कार्यक्रम पूर्ण केला. दरम्यान, या प्रकरणी पोलिस चप्पल फेकणाऱ्या आरोपीचा तपास घेत आहेत.

- Advertisement -

दर्शनचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, अद्याप चप्पल फेकणाऱ्या व्यक्तीचा तपास लागला नाही. मात्र तो दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमारचा चाहता होता. खरंतर, एका माहितीनुसार, एका मुलाखतीमध्ये दर्शन म्हणाला होता की, भाग्याची देवीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होत ज्यामुळे त्याला अनेकांनी ट्रोल देखील केलं होत.

 


हेही वाचा :

अशोक पंडित यांनी ‘पठाण’सोबत केली ‘द काश्मीर फाईल्स’ची तुलना; विवेक अग्निहोत्रींनी दिली प्रतिक्रिया

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -