Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Kanta Laga:'कांटा लगा' गाण्यामध्ये नेहा, टोनी आणि योयोचा अनोखा स्वॅग!

Kanta Laga:’कांटा लगा’ गाण्यामध्ये नेहा, टोनी आणि योयोचा अनोखा स्वॅग!

'कांटा लगा' हे गाण देसी म्यूझिक फॅक्ट्रीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केलं असून या गाण्यामध्ये नेहा,टोनी आणि हनी सिंग आपला धमाकेदार स्वॅग दाखवण्यास पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.

Related Story

- Advertisement -

नेहा कक्कर, (neha kakkar)हनी सिंग(honey singh)आणि टोनी कक्कड(tony kakkar) यांचे धमाकेदार गाणे ‘कांटा लगा'(kanta laga) नुकतंच रिलीज झाले आहे. या गाण्यात नेहाचा डीजे स्वॅग(dj swag) दिसत आहे.तिघांचीही ट्यूनिंग चाहत्यांना विशेष पसंतीस पडली(neha,yoyo,tony) असून गाण्याचा टीझर रविवारी प्रदर्शित झाल्यापासून चाहते गाण रिलीज होण्याची वाट पाहत होते. कांटा लगा हे गाणे रिलीज होताच सोशल मीडियावर गाण्याची तुफान चर्चा रंगली आहे. हे गाणे यूट्यूबवर आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे.(kanta laga song released swa the swag of neha tony and yoyo)

‘कांटा लगा’ हे गाण देसी म्यूझिक फॅक्ट्रीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केलं असून या गाण्यामध्ये नेहा,टोनी आणि हनी सिंग आपला धमाकेदार स्वॅग दाखवण्यास पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. गाण्यामध्ये नेहा कक्करचा घायाळ अंदाज पाहायला मिळणार असून हनी सिंगच्या रॅपने तर गाण्यामध्ये चार चाँद लावले आहेत असे म्हणायला हरकत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tony Kakkar (@tonykakkar)

- Advertisement -

कांटा लगा गाण्याचा टीजर 2 सप्टेंबरला रिलीज करण्यात येणार होता. मात्र दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे गाण टीजर 5 सप्टेंबरला रिलीज करण्याचा निर्णय मेकर्सने घेतला होता. नेहा आणि यो यो हनी सिंग यांची जोडी यापूर्वी सनी सनी या गाण्यामध्ये झळकली होती त्यांनी गायलेल गाण तुफान लोकप्रिय झालं होतं. आता काटा लगा या गाण्याची भूरळ प्रेक्षकांना कितपत पडेल हे पाहण महत्वाचे ठरणार आहे


- Advertisement -

हे हि वाचा – Happy Birthday Asha Bhosle: ८८ व्या वर्षीही आशा भोसलेंचा करिष्मा कायम

- Advertisement -