‘कांतारा’ लवकरच ओटीटीवर होणार प्रदर्शित

कांतारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहे. ऋषभ शेट्टीचा हा चित्रपट होऊन जवळपास दीड महिना झाला आहे. परंतु चित्रपटगृहामध्ये अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी लोक उत्सुक झाले आहेत. लवकरच हा चित्रपट जगभरातून एकूण 400 कोटींचा टप्पा पार करेल. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून समोर येत असलेल्या माहितीनुसार, कांतारा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर येत होती. परंतु चित्रपटाला चित्रपटगृहात मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होण्यास थोडा उशीर करण्यात आला. परंतु आता या चित्रपटाच्या ओटीटीवरील प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

‘कांतारा’ होणार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

‘कांतारा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवल्यानंतर आता लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याआधी 4 नोव्हेंबर रोजी ओटीटी वर चित्रपट प्रदर्शित होईल असं म्हटलं जात होतं. परंतु त्यानंतर याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आता 24 नोव्हेंबर पासून ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होईल.

काय आहे ‘कांतारा’ची कथा?
‘कांतारा’ चित्रपटाची कथा ऋषभ शेट्टीने लिहिली असून चित्रपटात मुख्य भूमिका देखील त्यांनीच साकारली आहे. या चित्रपटाची कथा रहस्यमय आणि चित्तथरारक आहे. यामध्ये 1870 मधील काळ दाखवण्यात आला आहे.

 

 


हेही वाचा :

‘सनी’ चित्रपटातील ‘तिरकीट जेम्बे हो’ गाणं प्रदर्शित