Kapil Sharma Biopic: कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा, ‘हे’ आहे सिनेमाचे नाव

कपिल शर्माने सिनेसृष्टीत करियर करण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केले आहे. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी केलेली मेहनत ते सुनील ग्रोवर सोबत झालेले भांडण यासारख्या अनेक गोष्टी सिनेमातून दाखवण्यात येणार आहेत.

Kapil Sharma biopic movie 'Funkaar' untold struggle stroy
Kapil Sharma Biopic: कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा, 'हे' आहे सिनेमाचे नाव

भारताचा सर्वांत सक्सेसफुल विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma )  सध्या त्याच्या नेटफ्लिक्स (Netflix)  शोमुळे चर्चेत आहेच मात्र कपिलची चर्चा होण्याचे आणखी एक खास कारण म्हणजे नुकताच कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. कपिलच्या आयुष्यातील त्याचा आतापर्यंतचा प्रवास या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे. कपिल शर्माला सिनेसृष्टीत कोणीही गॉड फादर नाही. त्यामुळे त्याचा आतापर्यंतचा प्रवास फार खडतर आणि प्रेरणादायी ठरला आहे. कपिलच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. मात्र एक विनोदवीर म्हणून त्याने नेहमी प्रेक्षकांना हसवले. कपिलच्या बायोपिकची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये वेगळीच उत्सुकता पहायला मिळाली.

फुक्रे या प्रसिद्ध सिनेमाचे दिग्दर्शक महावीर जैन हेच कपिल शर्माच्या बायोपिकवर काम करत आहेत. महावीर जैन यांनी शुक्रवारी कपिल शर्माच्या बायोपिकची घोषणा केली. ‘फनकार’ (Funkar)  असे कपिलच्या बायोपिकचे नाव आहे. लायका प्रोडक्शन अंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे. मृगदीप सिंह लांबा हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. तरण आदर्शने ट्विट करत कपिलच्या बायोपिकची माहिती दिली आहे.

सिनेमाचे दिग्दर्शत मृगदीप सिंह लांबा यांनी सिनेमाविषयी म्हटले आहे की, ‘भारतातील सर्वांत लोकप्रिय फनकार कपिल शर्माची कहाणी प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्ही तयार. प्रेक्षकांनी ही कहाणी आवडेल अशी आम्हाला आशा आहे’.

कपिल शर्माने सिनेसृष्टीत करियर करण्यासाठी प्रचंड स्ट्रगल केले आहे. डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी केलेली मेहनत ते सुनील ग्रोवर सोबत झालेले भांडण यासारख्या अनेक गोष्टी सिनेमातून दाखवण्यात येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

काही दिवसांपूर्वी द मॅन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत कपिल शर्माने म्हटले होते की, ‘मी आज जो काही आहे तो अर्चना पूरन सिंह यांच्यामुळे आहे. त्यांनी मला माझ्या करियरमध्ये फार मदत केली आहे. त्याच्यांमुळेच आज मी स्टार झालो’. कपिल शर्माचा नेटफ्लिक्सवर कपिल शर्मा: आय एम नॉट डन येट हा शो 28 जानेवारीला रिलीज होणार आहे.


हेही वाचा –  Priyanka Chopra बनणार आई! Nick Jonas सोबत करतेय फॅमिली प्लॅनिंग