‘स्कूटर वाल्यावर प्रेम का केलंस?’, दोन मुलं झाल्यावर Kapil Sharmaचा बायकोला प्रश्न

'आय एम नॉट डन येट' (I'm not done yet)  या शोमधून २८ जानेवारीपासून कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर लोकांना हसवताना दिसणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर शोचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये कपिलने त्याच्या बायकोला मजेदार प्रश्न देखील विचारला आहे.

kapil sharma official trailer release on netflix india kapil ask funny questions to his wife ginni
'स्कूटर वाल्यावर प्रेम का केलंस?', दोन मुलं झाल्यावर Kapil Sharmaचा बायकोला प्रश्न

बॉलिवूड आणि टेलिव्हीजनवर प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर सर्वांना लाडका कपिल शर्मा ( Kapil Sharma)  आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली कला दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘आय एम नॉट डन येट’ (I’m not done yet)  या शोमधून २८ जानेवारीपासून कपिल शर्मा नेटफ्लिक्सवर लोकांना हसवताना दिसणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर शोचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये कपिलने त्याच्या बायकोला मजेदार प्रश्न देखील विचारला आहे. गिन्नीने (Ginni Kapil Sharma )  देखील कपिलच्या प्रश्नाला सॉलिड उत्तर दिले आहे.

काही मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये कपिलची पत्नी गिन्नी चतरथ प्रेक्षकांमध्ये बसली आहे. तेव्हा कपिल गिन्नीला तिच्या लव्ह लाइफ विषयी प्रश्न विचारतो. ज्यावर गिन्नीने दिलेल्या उत्तराने संपूर्ण प्रेक्षक वर्गाचे हसणे थांबत नाही. गिन्नीसोबत कॉमेडियन भारती सिंह त्याचप्रमाणे कपिलची आई, रोशल राव, कीथ सिकेरा आणि सुदेश लाहिरी देखील उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिल म्हणाला, नेटफ्लिक्सच्या या शोमध्ये येण्याआधी घरी आरशासमोर दररोज आय एम नॉट डन येट असे म्हणायचो. एक दिवशी बायको गिन्नी आली आणि मला उशी फेकून मारली. म्हणाली दीड वर्षात दोन मुलं झाली आणखी काय प्लॅन आहे, कपिलने सांगितलेल्या या किस्स्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

त्यानंतर कपिलने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. कपिल म्हणाला, ‘माझ्या वडिलांनी घर बांधण्याबद्दल, बहिणीच्या लग्नाबद्दल सगळे सांगितले पण घरात कोणासोबत सेटल व्हायचे हे मला माहिती होतं ती व्यक्ती होती गिन्नी माझी बायको’. कपिल प्रेक्षकांमध्ये बसलेल्या गिन्नीकडे बघून तिला प्रश्न विचारतो ‘एका स्कूटर वाल्याच्या तू प्रेमात का पडलीस?’ इथे स्कूटरवाला म्हणजे स्वत: कपिल शर्माच होता. कपिलच्या प्रश्नाचे मजेशीर उत्तर देत गिन्नी म्हणाली, ‘मी विचार केला पैसे वाल्यांवर सगळेच प्रेम करतात, म्हटलं या गरिबाचे आपण भले करावे’. गिन्नीचे हे उत्तर ऐकून संपूर्ण प्रेक्षक वर्ग हसून हसून वेडा झाला. गिन्नीने दिलेल्या उत्तरावर कपिल शर्माची बोलती बंद झाली.


हेही वाचा –  ‘कपिल शर्मा शो’मध्ये पुन्हा सुमोना चक्रवर्तीची एण्ट्री