Kapil Sharma Show फेम अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला कोरोनाची लागण

सुमोनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत मी कोरोना पॉझिटिव्ह असून मला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. मागच्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्या असे आवाहन केले आहे.

Kapil Sharma Show fame actress sumon chakravarti tested corona positive

संपूर्ण देशाला हसवणारा हिंदी रिअँँलटी शो द कपिल शर्मा ( Kapil Sharma Show)  शोच्या सेटवर देखील कोरोनाने शिरकाव केला आहे. कपिल शर्मा शोमधील अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (sumona chakravarti ) कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. सुमोनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत मी कोरोना पॉझिटिव्ह असून मला कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. मागच्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुन घ्या असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या, कोरोना नियमांचे पालन करा असे देखील सुमोनाने म्हटले आहे.

बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोना लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मंगळवारी देखील बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना कोरोनाची लागण झाली. अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचालला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर निर्माती एकता कपूरची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली. त्याचप्रमाणे मंगळवारी सायंकाळी ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा आणि त्यांची पत्नी उमा चोप्रा यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करणायात आले.

अभिनेत्री करिना कपूर खानला कोरोनाची लागण झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत डेलनाज ईरानी, एकता कपूर,दृष्टी धामी,मृणाल ठाकूर,नोरा फतेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता नकुल मेहताची पत्नी आणि ११ महिन्याच्या बाळालाही कोरोनाची लागण झाली आहे. तर अभिनेता अर्जुन बिजलानी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिकार झाला.

करण जोहरच्या पार्टीनंतर अभिनेत्री करिनासोबत अर्जुन कपूर, अमृता अरोरा, राहुल वैद्य,नोरा,मृणाल ठाकूर,अंशुला कपूर, प्रेम चोपडा,रणवीर शौरीची मुलगी सोहेल खान, सीमा खान, महीप कपूर, शनाया कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा कोरोना पॉझिटिव्ह,रुग्णालयात दाखल