घरमनोरंजनकपिल शर्मा - गिन्नीचा विवाहसोहळा संपन्न!

कपिल शर्मा – गिन्नीचा विवाहसोहळा संपन्न!

Subscribe

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा आणि त्याची प्रेयसी गिन्नी चतरथ यांचा विवाहसोहळा बुधवारी पार पडला. त्यांच्या लग्नानंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा आणि त्याची प्रेयसी गिन्नी चतरथ यांचा विवाहसोहळा बुधवारी, १२ डिसेंबर रोजी पार पडला. त्यांच्या लग्नानंतरचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये पंजाबी पोषाखातील कपिल हातात तलवार घेऊन आपल्या संगिनीसोबत उभा आहे. दोघांच्या भावी आयुष्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी कपिल-गिन्नीला भरभरून शुभेच्छा दिल्या.

वाचा : कपिल शर्माच्या मेहंदीचे फोटो इन्स्टाग्रामवर

 

View this post on Instagram

 

?

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

- Advertisement -

कपिलच्या लग्नाची पूर्वतयारी 

यापूर्वी कॉमेडियन कपिल शर्माच्या मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गिन्नी हिने हे फोटो शेअर केले होते. कपिलचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये त्याचे कॉमेडियन सहकलाकारही सहभाग घेतला. यासाठी अमृतसर येथील कपिलच्या घरात तयारी करण्यात आली. कपिलचे घर सजवण्यात आले. कपिल आणि गिन्नीचा भेट कॉलेजमध्ये झाली होती. कपिल जेव्हा हंस बलिये नावाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता, तेव्हा त्यांच्यातील संबंध जास्त जवळ आले होते. गिन्नी जालंधरची आहे. गिन्नीने शिक्षणात एमबीएची पदवी मिळवली आहे. सध्या ती आपल्या वडिलांच्या व्यवसायात त्यांना मदत करत आहे.

- Advertisement -

वाचा : कपिल शर्माची लग्नपत्रिका व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -