Good News : कपिल शर्माच्या घरी कुणी तरी येणार…येणार गं

कपिल शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा.

Kapil Sharma will be a father for the second time
कपिल शर्मा दुसऱ्यांदा होणार बाबा

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचा आवडता आणि लोकप्रिय शो म्हणून ओळखला जाणारा कार्यक्रम म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’. हा शो बंद होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती. मात्र, हा शो का बंद होणार याचे कारण सांगितले गेले नव्हते. परंतु, आता या शोचे खरे कारण समोर आले आहे. कारण कपिल शर्माने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कपिल शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे त्यांनी ट्विटरमधून त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कपिलच्या घरी पाळणा हलणार आहे.

काय म्हणाला कपिल?

कपिल शर्माने ट्विट करत म्हटले आहे की, ‘द कपिल शर्मा शो फेब्रुवारीत दुसऱ्या आठवड्या ऑफ एअर होणार आहे. कारण मला माझ्या पत्नीसोबत काही वेळ घालवण्यासाठी घरी राहायचे आहे. याचे कारणही तसेच खास आहे, ते म्हणजे मी माझ्या दुसऱ्या बाळाचे स्वागत करु शकेन’. पहिल्यांदाच कपिलने त्याच्या अधिकृत ट्विटरवरुन त्याच्या चाहत्यांना महिती दिली आहे.

आणि प्रमोशन कॅम्पेन निघाले

कपिल शर्माने नवीन वर्षाच्या सुरुवातीला एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, “मी आनंदाची बातमी देत आहे. मी बाबा होणार आहे”. त्याच्या या ट्विटमुळे सोशल मीडियावर चर्चेला चांगलेच उधाण आले. पण, ते एका प्रमोशनलचे कॅम्पेन निघाले. त्यांनी नेटफ्लिक्ससोबत नवीन शोची माहिती दिली होती.


हेही वाचा – ‘या’ महिन्यात हलणार करिना आणि सैफच्या घरात दुसऱ्यांदा पाळणा