अगाऊपणा नडला कपिल शर्माचा सीन ‘गदर’ सिनेमातून केला कट

'गदर' सिनेमाचं शुटींग अमृतसर मध्ये करण्यात येत होत.

kapil sharma worked in gadar but his scene was chopped off due to this reason
अगाऊपणा नडला कपिल शर्माचा सीन गदर म्हणून कट केला

बॉलिवूडमध्ये तसेच छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने तसेच कॉमेडीने लोकांचे मनोरंजन करणारा कपिल शर्माने 2001 साली  अभिनेता सनी देओल (Sunny Deol) तसेच अमीषा पटेल (Ameesha Patel)यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘गदर’ सिनेमात काम केलं होतं. अशी महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे. पण चित्रिकरणा दरम्यान कपिलच्या काही अगाऊपणामुळे सिनेमातून त्याचा सिन कट करण्यात आला. या घटनेचा खुलासा स्वत: कपिल शर्मा याने त्याच्या कॉमिडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये केला होता. यावेळेस अभिनेता सनी देओल कपिलच्या सेटवर एका एपिसोडच्या शुटींगकरीता पोहोचला असता.  संवादा दरम्यान कपिलने त्याने ‘गदर ‘सिनेमात काम केलं असल्याचे सांगितलं होत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

‘गदर’ सिनेमाचं शुटींग अमृतसर मध्ये करण्यात येत होत. तेव्हा अशी अफवा पसरवण्यात आली होती  सिनेमात काम करणाऱ्या व्यक्तीला सनी देओलला भेटण्याची संधी मिळणार आहे. पण त्या दिवशी फक्त अमरीश पुरी आणि अमिषा पटेल शूटींवर उपस्थित होते. कपिल त्याच्या मित्रासोबत शुटींग लोकेशनवर पोहोचला त्यांना फक्त ट्रेन मध्ये धावत येऊन चढायचे होते. पण कपिलला वाटले  एवढ्या गर्दीत तो कॅमेरात दिसणार नाही यासाठी त्याने एक शक्कल लढवली. डारेक्टरने अॅक्शन बोलताच तो लोकं धावत असणाऱ्या दिशेच्या विपरीत म्हणजेच उलट्या बाजूने धावू लागला. यानंतर डारेक्टरने त्याची चूक पकडली व कपिलला चांगलाच ओरडा मिळाला होता. यानंतर पुन्हा शुटींग सुरू करण्यात आलं आणि त्याला योग्य दिशेने धावण्यास सांगितले गेले.

कपिल यानंतर खूप खुश झाला होता. त्याला वाटले की तो सुद्धा आता सिनेमात झळकणार आहे. सिनेमा रिलीज होताच कपिलने सिनेमा पाहिला तेव्हा त्याने केलेल्या शुटींगचा भाग काढून टाकण्यात आला आहे असे त्याच्या निदर्शनास आले. हि संपुर्ण घटना ऐकूण अभिनेता सनी देओल आश्चर्यचकीत झाले होते.हे हि वाचा – दिपिकाच्या वस्तू का ढापतोस? स्लिंग बॅगवरून रणवीर सिंह ट्रोल