घरमनोरंजनकपूर कुटुंबातील जहान'ची बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री, ट्रेलर रिलीज

कपूर कुटुंबातील जहान’ची बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री, ट्रेलर रिलीज

Subscribe

पिढयान् पिढ्या बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर  कुटुंबातील अजून एका नव्या चेहऱ्याची चित्रपटसृष्टीत एन्ट्री होत आहे.

पिढयान् पिढ्या बॉलीवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर  कुटुंबातील अजून एका नव्या चेहऱ्याची चित्रपटसृष्टीत एन्ट्री होत आहे. अभिनेता रणबीर कपूर( ranbir kapoor) आणि बेबो करीना कपूर (kareena kapoor)चा चुलत भाऊ असलेला ‘जहान’ कपूर (jahan kapoor) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हंसल मेहता( hansal mehta) यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फराज’ ( faraz) या चित्रपटातून जहान अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करणार आहे. जहान हा ज्येष्ठ अभिनेते शशि कपूर यांचा नातू आणि कुणाल कपूर यांचा मुलगा आहे.

- Advertisement -

जहानच्या फराज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात जहानच्या दमदार अभिनयाची चुणूक पाहायला मिळत आहे.  २०१६ साली जुलै महिन्यात बांग्लादेशमधील ढाका येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी एक भिडस्त तरुण दहशतवाद्यांना भिडला होता. याच तरुणाची भूमिका जहानने केली आहे. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी फराज प्रदर्शित होणार आहे. अभिनयाचा वारसा लाभलेल्या कपूर कुटुंबातील असल्याने जहान कडून प्रेक्षकांनाही बऱ्याच अपेक्षा आहेत. जहान हा शशि कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर यांचा मुलगा असून तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. जहान या चित्रपटाबद्दल उत्सुक असून त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही याबदद्ल भरभरून लिहले आहे. जहानचा अभिनय प्रेक्षकांच्या पंसतीस पडत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -