Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन कारण गुन्ह्याला माफी नाही मालिकेतून डॉ. गिरीश ओक एका वेगळ्या भूमिकेत

कारण गुन्ह्याला माफी नाही मालिकेतून डॉ. गिरीश ओक एका वेगळ्या भूमिकेत

Subscribe

सोनी मराठी वाहिनीवरील कारण गुन्ह्याला माफी नाही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. नेहमीच्या मालिकेपेक्षा निराळा विषय असल्यामुळे आणि मालिकेचा विषय थरारक असल्याने प्रेक्षकांचं या मालिकेवर जास्त प्रेम पाहायला मिळत आहे. मालिकेतील पात्रांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळत आहे. विशेष म्हणजे भोसले, जमदाडे आणि अनुजा हवालदार या पात्रांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार आता एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या नव्या मालिकेत आता अभिनेते गिरीश ओक यांची एन्ट्री होणार आहे. वसंत रणदिवे असे या व्यक्तिरेखेचं नाव आहे. बऱ्याच काळाने मालिकेत पुनरागमन ते करत आहेत. मालिका रंजक वळणावर आली असताना त्यांची मालिकेत एन्ट्री होत आहे त्यामुळे मालिका आता काय वळण घेणार हे पाहायला मिळेल.

- Advertisement -

‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेची टीम या मालिकेसाठीच कार्यरत आहे. हरीश दुधाडे आणि चंद्रलेखा जोशी यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांबरोबरच आता अश्विनी कासार हीसुद्धा पोलीस गणवेशात पाहायला मिळत आहे. यांचे हे स्पेशल ओप्रेशन स्कॉड मालिकेतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिका जेव्हापासून पसुरु झाली आहे तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.

अश्विनी साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आणि आता गिरीश ओक यांच्या येण्याने मालिका अजूनच थरारक आणि रंजक होणार हे नक्की. पाहायला विसरू नका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबद्दल फार कुतूहल आहे.


- Advertisement -

हेही वाचा- माणसं घडवणारी नाटकवाली बाई ! ‘रसिका आगाशे’

- Advertisment -