घरताज्या घडामोडीहुश्श! करण जोहरसह अभिनेत्री नीलम कोठारी आणि भावना पांडेचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

हुश्श! करण जोहरसह अभिनेत्री नीलम कोठारी आणि भावना पांडेचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

Subscribe

बॉलिवूड पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात येण्याची भिती

करिनाने करण जोहरने आयोजित केलेल्या एका छोट्या डिनर पार्टीला हजेरी लावली होती करिना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करण जोहरने देखील कोरोना चाचणी केली आणि त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. करण सोबतच अभिनेत्री नीलम कोठारी आणि भावना पांडे यांच्या कोरोना चाचण्या देखील निगेटिव्ह आल्याने तिघांना दिलासा मिळाला आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सुरू असलेल्या पार्ट्या बॉलिवूडकरांना चांगल्याच भोवल्या आहेत. अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा यांनी एका पार्टीदरम्यान कोरोनाची लागण झाली. करिनाने काल सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले.

सोमवारी अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता अरोरा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अभिनेते संजीव कपूर यांची पत्नी महीप कपूर आणि अभिनेता सोहेल खानची पत्नी सीमा खान यांच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. बॉलिवूडमध्ये सध्या सुरु असलेल्या पार्ट्यांमुळे बॉलिवूड पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

अभिनेत्री नीलम कोठारी आणि भावना पांडे या करण जोहरच्या पार्टीत नव्हत्या मात्र दोघीही एकत्र शुटींग करत होत्या तिथे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय आल्याने त्यांची चाचणी केली.  करण जोहर मात्र करिनासोबत पार्टीत होता मात्र त्याची कोरोना चाचणीही निगेटिव्हा आल्याने करणला दिलासा मिळाला आहे.

करिना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर करिनाचे घर मुंबई पालिकेकडून सील करण्यात आले आहे. करिनाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची पालिकेकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे. करिना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्या प्रवक्त्यांनी म्हटले करिना एक जबाबदार व्यक्ती आहे. कोरोना काळात तिने स्वत:ची आणि संपूर्ण कुटुंबाची योग्य काळजी घेतली. करिना एका छोट्या डिनर पार्टीला गेली होती. तिथे एक व्यक्ती सतत खोकत होता त्याच्यामार्फत करिना आणि अमृता यांना कोरोनाची लागण झाली. करिनाच्या प्रवक्त्यांनी त्या आजारी व्यक्तीने नाव सांगितले नाही.  करिना आणि अमृता नंतर पार्टीत उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरचे कोरोना रिपोर्ट आज येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – करिना अमृता नंतर महीप कपूर आणि सीमा खानही कोरोना पॉझिटिव्ह

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -