Meenakshi Sundareshwar: दिवाळीत करण जोहरचा ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ चित्रपट भेटीला

karan johar announced his production film meenakshi sundareshwar will start streaming on netflix from november 5
दिवाळीच्या मूहुर्तावर करण जोहरचा 'मीनाक्षी सुंदरेश्वर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

दिवाळीच्या मूहुर्तावर यंदा चित्रपटांचा मोठा धमाका पाहायला मिळणार आहे. विशेषत: ओटीटीवरही दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनासाठी मोठी पसंती मिळत आहे. यातच आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मेटिक एंटरटेनमेंटनेही दिवाळीत आगामी ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. विवेक सोनी दिग्दर्शित ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि अभिमन्यु दासानी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. ५ नोव्हेंबरला या चित्रपटाचा प्रीमियर शो पार पडणार आहे. याआधी अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट ४ नोव्हेंबरला आणि मार्वल स्टुडिओचा ‘इटर्नल्स’ हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये प्रेक्षकांना चित्रपटांची मोठी मेजवानी पाहायला मिळणार आहे.

असे म्हटले जाते की, एखाद्याच्या प्रेमात पडणे ही या जगातील सर्वात सुंदर भावना आहे आणि नेटफ्लिक्स हीच भावना यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ मधून साजरी करणार आहे. यातील प्रेमाच्या रंगात अजून रंग भरण्यासाठी मीनाक्षी आणि सुंदरेश्वरची नवी जोडी पुढाकार घेणार आहे. त्यामुळे प्रेमात आकंत बुडालेल्या प्रेमीयुगलांची एक सुंदर प्रेमकहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्सचा दावा आहे की, या चित्रपटातील नवविवाहित जोडपं प्रेक्षकांना एका सुंदर प्रवासावर घेऊन जातील ज्यामुळे प्रेक्षकांनाही चित्रपट पाहताना स्वतःच्या जीवनातील प्रवास पाहतोय की काय असा भास होईल. टुडम TUDUM ग्लोबल फॅन इव्हेंटमध्ये या जोडीची झलक दिसल्यापासून प्रेक्षक चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत. नेटफ्लिक्सने ५ नोव्हेंबर २०२१ रोजी या चित्रपटाच्या प्रीमियरची घोषणा केली.

विवेक सोनी दिग्दर्शित आणि धर्मेटिक एंटरटेनमेंट निर्मित “मीनाक्षी सुंदरेश्वर” चित्रपटात सान्या मल्होत्रा ​​आणि अभिमन्यू दासानी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना नातेसंबंधांमधील विविध पैलू, संयुक्त कुटुंब पद्धती, नवविवाहितांच्या लग्नातील अडचणी, संकोच आणि त्या दरम्यान घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. या चित्रपटात तरुण प्रेमी जोडप्याला लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशीपमधील आव्हानाचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे प्रश्न उद्भवतो की, हे लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशीप खरोखरच त्यांना एकमेकांच्या जवळ आणतं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळे नव्या वर्षातील या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जाणार आहे.