घरमनोरंजनकरण जोहरने 'त्या' व्हिडिओ मागचा केला खुलासा

करण जोहरने ‘त्या’ व्हिडिओ मागचा केला खुलासा

Subscribe

तुम्हाला या व्हिडिओबद्दल काहीतरी वाटलं, म्हणून त्या व्हिडिओ मागच तथ्याचा आधार न घेता तुम्ही आमच्या प्रतिमेवर चिखल फेक कराल का?, करण जोहर संतापून म्हणाला

बॉलिवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक करण जोहारने काही दिवसांपूर्वी पार्टी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी या व्हिडिओबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या होत्या. या व्हिडिओमधील सेलिब्रिटी ड्रग्जच्या नशेत असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपनंतर या व्हिडिओमधील एकाही कलाकाराने प्रत्युत्तर दिलं नव्हतं. अखेर हा व्हिडिओ करणारा करण जोहरने मौन सोडलं आहे. या सर्व आरोपात काही तथ्य नसल्याचे त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच त्याने यापुढे असे आरोप केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ही दिला आहे.

करणने असं स्पष्टीकरण दिलं आहे की, ‘ही आमच्या मित्र मंडळींची घरगुती पार्टी आहे, नुकताच विकी कौशल डेंग्यूतून बरा झाला होता. आठवडाभर काम केल्यानंतर माझे मित्र-मैत्रिणी एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी त्या पार्टीला आले होते. जर ड्रग्जची पार्टी होत असती तर हा व्हिडिओ आम्ही शेअर केला असता का? असा प्रश्न करणने सिनेपत्रकार राजीव मसंद यांच्याशी बोलताना उपस्थित केला.’

- Advertisement -

‘नेमकं त्याच वेळी विकी कौशलने नाक खाजवल्याने लोकांच्या मनात शंका वाढल्या. विकीला डेंग्यू झाला होता. तो आता कुठेतरी बरा होत आहे. तो गरम लिंबू पाणी पित होता. तर काही जण वाईन पित होते. हा व्हिडिओ काढण्याच्या पाच मिनिटं अगोदर माझी आई तिथे होती. म्हणजे ही कौटुंबिक सोशल पार्टी होती’, असं करण म्हणाला.

तसेच करणने संतापून म्हणाला की, ‘तुम्हाला या व्हिडिओबद्दल काहीतरी वाटलं, म्हणून त्या व्हिडिओ मागच तथ्याचा आधार न घेता तुम्ही आमच्या प्रतिमेवर चिखल फेक कराल का?’

View this post on Instagram

Saturday night vibes

A post shared by Karan Johar (@karanjohar) on

- Advertisement -

या पार्टीमध्ये दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, वरुण धवन, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, झोया अख्तर असे बॉलिवूड स्टार हजर होते.


हेही वाचा – ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाचा फस्ट लूक रिलीज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -