‘या’ चित्रपटातून Karan Johar करणार Ibrahim Ali Khan ला लॉन्च

या वर्षाच्या सुरूवातीला अशी बातमी समोर येत होती की, करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शन आणि फॉक्स स्टार स्टूडियोजने मल्याळम भाषेतील ‘हृदयम’ चित्रपटाचे अधिकार मिळवलेले आहेत. त्यामुळे करण जौहर लवकरच या चित्रपटाच्या माध्यमातून एका नव्या स्टार किडला लॉन्च करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘हृदयम’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी करण जौहरने सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला लॉन्च करायचा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या मते, करण जौहर गेल्या अनेक दिवसांपासून इब्राहिम अली खानला लॉन्च करण्यासाठी एका चांगल्या चित्रपटाच्या शोधात होता.

त्यामुळे ‘हृदयम’ चित्रपट इब्राहिम अली खानच्या बॉलिवूड पदार्पणासाठी अतिशय चांगला चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून करण जौहर इब्राहिम अली खानला लॉन्च करण्यासाठी एका चांगल्या चित्रपटाच्या शोधात होता. त्यामुळे आता ‘हृदयम’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये करणला इब्राहिम अली खान योग्य वाटत आहे. याशिवाय प्रसिद्ध निर्माते विनीत श्रीनिवास यांच्या ‘हृदयम’ चित्रपटातून प्रणव मोहनलाल आणि कल्याणी प्रियदर्शन यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

हिंदी सह तमिळ आणि तेलगू भाषेत बनवणार रिमेक

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 करण जौहरने यावर्षीच्या सुरूवातीला घोषणा केली होती की, या चित्रपटाचे तो हिंदी सह तमिळ आणि तेलगू भाषेतसुद्धा रिमेक बनवणार आहे. याशिवाय करणकडे सध्या इतर चित्रपट सुद्धा आहेत ज्यामध्ये ‘ब्रम्हास्त्र’, ‘योद्धा’ आणि ‘जुग जुग जियो’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

 


हेही वाचा :‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात कमावला इतक्या कोटींचा गल्ला!!