Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Bigg Bossच्या घरात राहण्यास नकार देत करणने केला मोठा खुलासा

Bigg Bossच्या घरात राहण्यास नकार देत करणने केला मोठा खुलासा

करण या रिअॅलिटी शोमध्‍ये कधीच स्‍पर्धक म्‍हणून दिसणार नाही.

Related Story

- Advertisement -

हिंदी टेलिव्हिजनवरील सुपरहिट रियॅलिटी शो ‘बिग बॉस’चा १५ सीजन ‘Bigg Boss OTT’ लवकरचं सुरु होणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्येही नव्या सीजनबद्दल उत्सुकता वाढली आहे. यंदाचा बिग बॉस अनेक गोष्टींमुळे खास ठरणार आहे. कारण हा शो आता प्रीमियर टीव्हीवर होणार नाही, तर ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. तर शोच्या होस्टमध्येही मोठा बदल केला आहे. सलमान खान दर वेळीप्रमाणे या कार्यक्रमाचे होस्टिंग करेल, पण ओटीटीवर जो शो प्रदर्शित होणार आहे, त्याचे होस्टिंग करण जोहर करणार आहे.करण जोहर स्‍वत: सर्वात मोठा वादग्रस्‍त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’चा चाहता आहे. म्‍हणून ‘बिग बॉस ओटीटी’चा होस्‍ट बनणे हे  दिग्‍गज चित्रपट निर्मात्यासाठी स्‍वप्‍न पूर्ण झाल्‍यासारखे आहे. हा शो टेलिव्हिजनवर प्रिमिअर होण्‍यापूर्वी ८ ऑगस्‍ट २०२१ पासून सहा आठवडे फक्‍त वूटवर पाहता येणार आहे.रिअॅलिटी शोच्‍या घरात होस्ट म्हणून भूमिका बजावण्यास, स्पर्धकांना मार्गदर्शन करण्‍यास किंवा त्‍यांच्‍यासोबत बॉसप्रमाणे वागण्‍यास करण उत्‍सुक असला तरी त्याची स्‍वत: घरामध्ये राहण्याची अजीबात इच्‍छा नाहीये.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

- Advertisement -

बिग बॉस ओटीटी हाऊसमध्‍ये स्‍पर्धक म्‍हणून सहा आठवडे जर स्पर्धक म्हणून करणची निवड केली तर करण काय करणार असा सवाल करणला केला असता करण म्हणाला ”सहा आठवडे घरामध्‍ये? मी एक तासही माझ्या फोनशिवाय राहू शकत नाही. विचार करा, मी एका तासामध्‍ये किती गोष्‍टी चुकवेन. अरे बापरे, माझी असे होण्‍याची जरादेखील इच्‍छा नाही.”नियमांनुसार कोणताही स्‍पर्धक घरामध्‍ये मोबाईल फोन घेऊन जाऊ शकत नाही. असे असेल तर, निश्चितच करण या रिअॅलिटी शोमध्‍ये कधीच स्‍पर्धक म्‍हणून दिसणार नाही.


हे हि वाचा – ‘तारक मेहता का उल्ट चष्मा’ फेम सोनूचा डांस पाहून चाहते झाले चकीत

- Advertisement -