‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वेलमध्ये करण जौहरची ड्रीम कास्ट

'कुछ कुछ होता है' चित्रपटाकडे बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून पाहिले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, आता करण जौहर याचा दुसरा सिक्वेल बनवणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत करण जौहरला या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने त्याच्या ड्रीम कास्टचं नाव सांगितलं

करण जौहरचा १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट आजही अनेकजण आवडीने पाहतात. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जौहरनेच केलं होतं. या चित्रपटात अभिनेता शाहरूख खान, काजोल आणि रानी मुखर्जी हे तिघे मुख्य भूमिकेत होते. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाकडे बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक म्हणून पाहिले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, आता करण जौहर याचा दुसरा सिक्वेल बनवणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत करण जौहरला या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने त्याच्या ड्रीम कास्टचं नाव सांगितलं.

‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलमध्ये हे कलाकार
नुकत्याच एका मुलाखतीत करण जौहरला या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याने त्याच्या ड्रीम कास्टचं नाव सांगितलं. त्यावेळी तो म्हणाला की, मी ‘कुछ कुछ होता है’ च्या दुसऱ्या सिक्वेलमध्ये शाहरूखच्या जागी तो रणवीर सिंहला पाहतो, तर काजोलच्या जागी तो आलिया भट्ट आणि राणी मुखर्जीच्या जागी तो जान्हवी कपूरला पाहतो.

तसेत करण जौहरला विचारण्यात आलं की, त्याची मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्याला त्यांच्यासाठी कसे चित्रपट तयार करायला आवडेल? त्यावर त्याने सांगितलं की, मला आजच्या काळातील मुलांना पाहून वाटतं की, मुलं चित्रपटांमध्ये इनवॉल्व होत आहेत, त्यामुळे मी त्यांच्यासाठी फक्त चित्रपटचं नाही तर आनंदी चित्रपट तयार करेन, कारण मुलांना फक्त आनंदचं द्यायला हवा.

दरम्यान, करण जौहरने सध्या त्याचा ‘कॉफी विद करण’ च्या सातव्या सीजनला सुरूवात केली आहे. तीन वर्षानंतर हा शो पुन्हा सुरू झाला आहे. या सीजनची सुरूवात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्यापासून झाली.


हेही वाचा :दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रमची प्रकृतीत सुधारणा, अभिनेता लवकर बरा व्हावा यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना