Karan V Grover अडकला विवाह बंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच चाहत्यांना बसला धक्का!

सध्या लग्नसराईची धावपळ सगळीकडेच पाहायला मिळत आहे. सामान्यांपासून ते मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांपर्यंत अनेकजण विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच आता हिंदी टेलिव्हिजन अभिनेता करण व्ही ग्रोव्हर त्याची गर्लफ्रेंड पॉपी जब्बलसोबत नुकताच लग्न बंधनात अडकला आहे. दोघेही गेल्या १० वर्षांपासून एकत्र आहेत.

मंगळवारी करण व्ही ग्रोव्हरने त्याच्या इंस्टग्राम अकाउंटवर याबाबत लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो आता प्रचंड प्रमाणत व्हायरल होत असून सोशल मिडियावरक करण व्ही ग्रोव्हरला त्याचे चाहते अनेक शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan V Grover (@karanvgrover)

इतकचं नव्हे तर करण व्ही ग्रोव्हरच्या लग्नातील आऊटफिट्सची सुद्धा बरीच चर्चा होत आहे. करण व्ही ग्रोव्हरने लग्नात पांढऱ्या आणि क्रिम रंगाची शेरवानी, पांढरा पायजमा आणि गुलाबी रंगाची पगडी परिधान केली आहे. तर त्याची पत्नी पॉपी हिने पांढऱ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. त्याबरोबरच पॉपीने सुंदर दागिने सुद्धा परिधान केले आहेत. लग्नामध्ये परिधान केलेल्या पेहरावात दोघेही आकर्षक दिसत आहेत.

करण व्ही ग्रोव्हरने लग्नाचे फोटो शेअर करत, खाली कॅप्शनमध्ये ,”MayDAY,MayDAY….आम्ही शेवटी ते केलंच”. असं लिहिल आहे. करण व्ही ग्रोव्हरची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, करण व्ही ग्रोव्हर आणि पॉपी जब्बलने हिमाचल प्रदेशमध्ये लग्न केले असून त्यांच्या लग्नामध्ये फक्त त्यांचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, “हे जोडपे लग्नानंतर इतर मित्र-मैत्रीणींसाठी एक आलिशान रिसेप्शन पार्टी ठेवणार आहेत.

 


हेही वाचा :http://‘मुन्नाभाई MBBS 3’ चित्रपटाबाबत अभिनेता Sanjay Dutt आणि Arshad Warsi ने दिली ही प्रतिक्रिया