Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन करणच्या मुलांचा सोशल मीडियावर धूमाकूळ

करणच्या मुलांचा सोशल मीडियावर धूमाकूळ

करण त्याच्या मुलांचे फोटो सतत सोशलमीडियावर शेअर करत असतो.

Related Story

- Advertisement -

करण जोहर २०१७ साली सरोगसीच्या माध्यमातून पिता बनला होता. मुलांच्या येण्याने करणचे आयुष्यच पलटले होते. यश आणि रुही या जुळ्या मुलांचे त्याच्या आयुष्यात आगमन झाले होते. मुलांच्या जन्मानंतर हे दोघे माझं विश्व आहे आणि त्यासाठी इतर कामं मी करणार नाही अशा भावना त्याने व्यक्त केल्या होत्या. करण त्याच्या मुलांचे फोटो सतत सोशलमीडियावर शेअर करत असतो. आताही करणने यश आणि रुहीचा नवीन फोटो शेअर केला आहे. धमाल आणि मस्ती करतानाचा यश आणि रुहीचा हा फोटो आहे. करणच्या लेकरांची ही मस्ती चाहत्यांना देखील आवडत आहे. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांच्या लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 करणची मुले इतर स्टारकिड्सना त्यांच्या क्युटनेसमध्ये टक्कर देत आहे. सर्वाधिक स्टारकिडसच्या व्हिडिओंना पसंती करणच्याच मुलांना मिळत असल्याचे पाहायला मिळते. लॉकडाऊन दरम्यान करणने सर्वाधिक वेळ त्याच्या मुलांबरोबर आणि आईसह घालवला होता. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

 या व्हिडिओत करण त्याच्या मुलांसोबत रॅपिड फायर खेळत होता. करण नेहमी त्याचा संपूर्ण वेळ त्याच्या मुलांबरोबर घालवतो.


हे वाचा- करिना कपूरने घातला चक्क २६ हजार रुपये किमतीचा मास्क

- Advertisement -