Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन कारभारी लयभारी फेम अभिनेत्रीला मारहाण

कारभारी लयभारी फेम अभिनेत्रीला मारहाण

कारभारी लयभारी या मालिकेतील अभिनेत्री गंगासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे ती फार घाबरुन गेली आहे. तिने शेअर केल्या व्हिडिओतून तिच्या सोबत घडलेल्या घटनेची तीव्रता समजते.

Related Story

- Advertisement -

झी मराठी वाहिनीवरील ‘कारभारी लयभारी’ या लोकप्रिय मालिकेने अल्पवधीतच सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. यामधील ‘गंगा’ या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तृतीयपंथी असलेली गंगा म्हणजेच ‘प्रणित हटेला’ ही स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. मात्र समाजातून तिला मिळणारी वागणूक ही अतिशय लाजिरवाणी आहे. प्रणित ला एका धक्कादायक प्रकाराला सामोरं जावं लागले आहे. २५ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजता गंगासोबत एक भयंकर प्रकार घडला होता.

प्रणित ही तिच्या मित्राला नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये सोडण्याकरिता गेली होती. त्यावेळी गंगाला एका अज्ञात तृतीयपंथ्याकडून मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार रमाबाई कॉलनी येथे घडला. या ठिकाणी तिला एका तृतीयपंथ्याकडून गंगाला प्रश्न विचारण्यात आले. तू एवढे मोठे केस का वाढवले तू कोणत्या समुहातील आहे? तुझा गुरु कोण आहे? यासारखे प्रश्न विचारुन गंगाला मारहाण करण्यात आली. ती व्यक्ती गंगाचे केस धरुन जोराने तिला मारहाण करत होती. या प्रसंगादरम्यान वेळीच जर गंगाने तिथुन पळ काढला नसता तर गंगावर दगड फेकून तिला जखमी देखील केलं असतं. पण या घटनेने गंगा खूप घाबरली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडिओतून आपण घटनेची तीव्रता समजू शकतो.

- Advertisement -

 पंतनगर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पोलीस त्या तृतीयपंथ्याचा तपास करत आहे. ‘झी युवा’च्या मंचावर गंगाला पहिल्यांदा ओळख मिळाली. तृतीयपंथी असलेल्या गंगाचा स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यापासून ते स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत बिकट होता. गंगा ही कारभारी लयभारी मालिकेत ती कलाकार म्हणून वेगळ्या भूमिकेत लोकांसमोर आली. आपल्या अभिनय कौशल्यावर तिने ही भूमिका मिळवली आहे.


हे वाचा-अनुराग कश्यपची लेक आलिया ट्रोलर्सची शिकार

- Advertisement -