सैफने देशाच्या लोकसंख्येत…; करिना कपूरचा तिसऱ्या प्रेग्नंसीबाबत खुलासा

kareen kapoor pregnancy rumours says says saif already contributed way too much to the population

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान तिच्या फॅशन सेन्ससह अनेक कारणांमुळे चर्चेत असते. अशात करिना तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा सुरु आहे. सध्या करिना लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत व्हेकेशन एन्जॉय करतेय. याचदरम्यानचे करिनाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात करिनाचं पोट वाढलेलं दिसतयं, यामुळे ती पुन्हा गरोदर आहे की काय अशा चर्चांना उधाण आलेय. मात्र या चर्चांवर करिनाने जाहीर स्पष्टीकरण दिले आहे.

करीना कपूरने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.

ज्यात तिने ती पुन्हा गरोदर नसल्याचे स्पष्ट केले आहे. करिनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे… त्यामुळे जरा धीर धरा.. मी गरोदर नाही… सैफच्या मते त्याने देशाच्या लोकसंख्येत आधीच खूप योगदान दिले आहे”, असे करीनाने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. करीनाच्या या पोस्टमुळे ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

करीना कपूर कुटुंबियांसोबत सध्या लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. या व्हेकेशन प्लॅनमध्ये तिच्यासोबत तिची बहीण करिश्मा कपूर आणि मैत्रीण अमृता अरोरादेखील पाहायला मिळते. या दोघींनीही सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केलेत. ज्यात करीना कपूर तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसतेय. तसेच करीना कपूरने पती सैफ अली खान, मुलं तैमुर आणि जेह यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये करिनाचं पोट वाढलेलं दिसतय. त्यावरून ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सुरु झाली. पण आता नुकतंच तिने यावर स्पष्टीकरण दिले आहे.


राणादा-पाठकबाईंकडून चाहत्यांना सरप्राईज; लवकरच झळकणार ‘या’ चित्रपटात