बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा नव्या चित्रपटात दिसणार आहे. आगामी काळात करीना ओटीटीवरील ‘जाने जान’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. नुकताच या वेब सीरीजचा ट्रेलर देखील रिलीज झाला होता. दरम्यान, अशातच आणखी एका कारणामुळे करीनाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
करीनाने केला राष्ट्रगीताचा अपमान?
I think Kareena Kapoor doesn’t even know that you have to stand carefully during the national anthem and not hold hands.🧐#NationalAnthem#KareenaKapoor #Bollywood #saifalikhan pic.twitter.com/PQbuZml4eO
— Chaudhary Mayur (@Anjana_Mayur_7) September 10, 2023
करीना कपूर नुकतीच महिलांच्या समस्यांशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात करीनाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या वेळचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात करीना राष्ट्रगीत गाण्यासाठी उभी असल्याचं दिसत आहे. राष्ट्रागीताच्या सुरुवातीला करीना सरळ उभी होती त्यानंतर तिने हात पुढे केले आणि बांधले. करीनाची ही हालचाल पाहून नेटकरी सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करताना दिसत आहे.
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
करीनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एकाने ट्रोलरने लिहिलंय की, “तुम्ही इथेही अभिनय करत आहात का?” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “अभिनेत्री असून हिला राष्ट्रगीत सुरु असताना कसं उभं राहायचं हे देखील माहित नाही.”