घरमनोरंजन'कॉफी विद करण ७'च्या सेटवरून करीना कपूर आणि अमीर खानचे फोटो व्हायरल

‘कॉफी विद करण ७’च्या सेटवरून करीना कपूर आणि अमीर खानचे फोटो व्हायरल

Subscribe

'कॉफी विद करण ७'च्या सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत. ज्यामध्ये करीना कपूर आणि अमीर खान दिसून येत आहेत

करण जौहरच्या सुप्रसिद्घ ‘कॉफी विद करण’च्या नव्या सीजनची काही दिवसांपूर्वीच सुरूवात झाली. आत्तापर्यंत या शोचे चार एपिसोड पार पडले आहेत. या सीजनच्या पहिल्या एपिसोडमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंहने हजेरी लावली होती. त्यानंतर जान्हवी कपूर, सारा अली खान, अक्षय कुमार, समंथा रूथ प्रभू, अनन्या पांडे, विजय देवरकोंडा या कलाकारांनी हजेरी लावली होती. आता या शोमध्ये करीना कपूर आणि अमीर खान हजेरी लावणार आहेत. ‘कॉफी विद करण’च्या सेटवरील शूटिंगदरम्यानचे काही फोटो लीक झाले आहेत.

‘कॉफी विद करण ७’च्या सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत. ज्यामध्ये करीना कपूर आणि अमीर खान दिसून येत आहेत. दोघं या शोमध्ये त्यांच्य आगामी लाल सिंह चढ्ढा चित्रपटाच्या प्रमोशन साठी येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Serap Varol (@serap.varol.20)

- Advertisement -

‘कॉफी विद करण ७’ सेटवरून जे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये करीना कपूरने काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून येत आहे. तर अमीर खानने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाची जीन्स असा पोशाख परिधान केला आहे. या मध्ये अमीर कोणालातरी काहीतरी सांगताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये करण आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढताना दिसत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अमीर खान, करीना कपूर आणि करण जौहरच्या या शोमध्ये सध्या बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत अनेक कलाकारांनी हजेरी लावली आहे. अमीर खान आणि करीनासोबतच्या या एपिसोडमध्ये करण जौहर दिलखुलास गप्पा मारणार आहे. तसेच त्यांच्या आगामी ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाबाबतही खूप गप्पा मारणार आहेत.


हेही वाचा :समंथाने खरेदी केलं हैदराबादमधील नागा चैतन्यचं घर

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -