Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन करिना, सैफ दुसऱ्यांदा झाले आई बाबा

करिना, सैफ दुसऱ्यांदा झाले आई बाबा

तैमुर झाला दादा

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि सैफ अली खान दुसऱ्यांदा आई -बाबा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये करिनाला काल रात्री दाखल करण्यात आले. त्यानंतर आज तिने गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर येत आहे. सैफ अली खान आणि करिनाने दुसऱ्यांदा मुलगा झाला आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करिनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती. दरम्यान करिना, सैफला तैमुर हा पहिला गोंडस मुलगा आहे. सेलिब्रिटी किड्समध्ये तैमुर सर्वाधिक चर्चेत असतो. पापाराझी देखील त्याची प्रत्य़ेक झलक टिपण्यासाठी सैफ करिनाच्या घराखाली वाटत पाहत असतात. (Kareena Kapoor and Saif Ali Khan blessed with a baby boy)

गोंडस मुलाच्या आगमनाने खान आणि कपूर कुटुंबियांकडून आनंद व्यक्त केला आहे. करिनाला दुसरा मुलगा झाल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं आहे. आज सकाळी 9 वाजता तिनं बाळाला जन्म दिला असल्याचं रणधीर कपूर यांनी सांगितलं. बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि करिना कपूर जोडी अधिक प्रसिद्ध आहे. तैमुरच्या रुपाने त्यांनी पहिल्यांदा आईबाबा होण्याचे सुख अनुभवले. त्यानंतर आता करिना सैफ दुसऱ्यांदा आई बाबा झाल्याचे वृत्त कळताच बॉलिवूडमधून तसेच सोशल मिडियावरुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची बातमी कळताच त्याच्या नावापासून ते बारश्यापर्यंत सर्वकाही ठरवून मोकळे झाले आहे.

- Advertisement -

नुकतेच सैफने दुसऱ्या बाळासोबत आणि करिनासोबत वेळ घालवण्यासाठी कामातून रजा घेतली आहे. करिना गेल्या नऊ महिन्यापासून मातृत्त्वाचा पुरेपुर आनंद घेत होती. अनोख्या स्टाईलमुळे करिना सतत चर्चेत होती. गरोदपणातही अनेकवेळा ती मैत्रिणी, कुटुंबियांसोबत वेळा घालवताना दिसत होती. त्यामुळं करीना एका वेगळ्याच अंदाजात चाहत्यांची मनंही जिंकत होती.


हेही वाचा- KGF स्टार यशच्या चाहत्याची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये अभिनेत्याचा उल्लेख

- Advertisement -