घरमनोरंजनकरिना-सैफ तैमूरला घालणार बोर्डिंग स्कूलमध्ये!

करिना-सैफ तैमूरला घालणार बोर्डिंग स्कूलमध्ये!

Subscribe

करिना कपूरने अलीकडेच सांगितले की कदाचित आम्ही तैमूरला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवू असे सांगितले आहे.

बॉलिवूड विश्वातील सर्वात सुप्रसिद्ध असणारा स्टारकिड म्हणून तैमूर हा ओळखला जातो. त्याने कोणतीही हरकत केली तरी माध्यमांकडून विशेषतः फोटोग्राफरकडून तैमूरची दखल घेतली जाते. तैमूरची आई अर्थात करिना कपूरने अलीकडेच सांगितले की कदाचित आम्ही तैमूरला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवू. सैफ आणि आपल्यात याबाबत एकमत आहे, असेही तिने आवर्जून सांगितले. तैमूरने एक सामान्य आयुष्य जगावं. करिना आणि सैफ शूटिंगमध्ये बिझी असतात, हेही कारण त्याला बोर्डिंगला पाठवण्याचा विचार करण्यामागे आहे, असेही त्यांना वाटते.

- Advertisement -

बोर्डिंग स्कूलमध्ये घालण्याच्या करिनाच्या या निर्णयाला सैफ अली देखील सहमत आहे. मुलं कमी वयात मीडिया अटेंशनपासून दूर राहावीत तसेच सामान्य पद्धतीने मोठी व्हावीत म्हणून स्टारकिड्सना बाहेर पाठवावे लागते, असे सैफदेखील एकदा बोलला होता.


ऐका राखी सावंत सांगते लग्नानंतरच्या व्यथा

तैमूर हा मीडिया अटेंशनपासून दूर राहवा यासाठी यापूर्वी देखील सैफ यावर बोलला होता. त्यावेळी सैफ असा बोलला होता की, तैमूरला आता फोटोग्राफर्सची सवय झाली आहे. तो कॅमेऱ्याला न घाबरता डायरेक्ट हाय-हॅलो करतो. तसेच. मीडियाने देखील तैमूर एवढं अटेंशन देऊ नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -