घरताज्या घडामोडीसैफ-करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावर स्वतः बेबोने केला मोठा खुलासा

सैफ-करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावर स्वतः बेबोने केला मोठा खुलासा

Subscribe

लवकरच सैफ अली खानच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार

बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव काय असणार, यावरून सध्या चर्चा सुरू आहेत. पण आता स्वतः करीना कपूरने याबाबत खुलासा केला आहे की, त्या दोघांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव काय ठरवले आहे. लवकरच सैफ अली खानच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे. मार्च २०२१ मध्ये करीना दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे.

करीना आणि सैफचा पहिला मुलगा तैमूर अली खान (Taimur Ali Khan) हा एक लोकप्रिय स्टार किड आहे. त्यामुळे तैमूरनंतर सैफच्या घरी येणार चिमुरड्याची सगळ्यांना प्रतिक्षा आहे. यादरम्यानच करीनाने आपल्या येणाऱ्या बाळाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. आपल्या लोकप्रिय टॉक शो ‘व्हॉट व्हूमन वॉन्ट’ (What Women Want)च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये करीनाने आपल्या येणाऱ्या बाळाबाबत बोलली आहे. या एपिसोडमध्ये अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) गेस्ट म्हणून आली आहे. परंतु यावेळी शोमध्ये नेहाबाबत काही बातचित केली नसून दोघी जणी मातृत्वाबाबत बोलत आहेत. जरी ही मुलाखत नेहाची असली तरी करीनाने होणाऱ्या बाळाबाबत खुलासा केला आहे.

- Advertisement -

जेव्हा करीना पहिल्यांदा आई झाली आणि तिच्या मुलाचे नाव तैमूर ठेवले तेव्हा सोशल मीडियावर चांगलाच हंगामा झाला होता. परंतु आता करीना आणि सैफने यावेळी आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव कशाप्रकारे ठेवणार आहेत, हे निश्चित केले आहे. जेव्हा करीनाला नेहाने बोलता बोलता तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावाबाबत प्रश्न विचारला तेव्हा करीनाने स्पष्टपणे सांगितले की, ‘मी आणि सैफने ठरवले की, जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो आपण तेव्हाच घेऊ आणि सर्वांना सरप्राईज देऊ.’

- Advertisement -

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीनाने आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्डा’ शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा ती आमिर खानसोबत दिसणार आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, करीना कपूर मार्च २०२१मध्ये जन्म देणार आहे.


हेही वाचा – बिग बॉस फेम रश्मीचा हॉट फोटो पाहून तो म्हणाला, ‘तुला अटक होणार!’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -