घरमनोरंजनमुझे आंटी मत कहो - करीना कपूर

मुझे आंटी मत कहो – करीना कपूर

Subscribe

अरबाज खानच्या 'पिंच बाय अरबाज खान' शोमध्ये करीना कपूरने 'आता तू काकू झाली आहेस त्यामुळे लहान मुलांसारखे वागणे बंद कर' या कमेंट करणाऱ्या यूजर्सला टोला लगावला आहे.

बॉलीवूडमधील कलावंत हे सोशल मीडियावर त्यांच्या फोटोमुळे, व्हिडिओ, तसेच त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे चाहते त्यांना ट्रोल करत असतात. अलिकडेच लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर हिला सोशल मीडिया यूजर्सने ट्रोल केले होते. एका यूजर्सने तिला ‘आता तू काकू झाली आहेस त्यामुळे लहान मुलांसारखे वागणे बंद कर’ असा सल्ला तिला होता. याच कमेंटवर अरबाज खानच्या ‘पिंच बाय अरबाज खान’ शोमध्ये प्रश्न विचारले असता, ती थोडी नाराज झाली आणि तिने त्यावर असे उत्तर दिले की, सेलिब्रिटी, अभिनेत्री किंवी अभिनेता यांना कुठल्याही भावना नसतात. त्यामुळे त्यांनी फक्त सर्व ऐकून घ्यायचे, असे बोलून करीनाने यूजर्सला उत्तर दिले आहे.

‘आंटी’ कमेंटच्या प्रश्नांवर बेबो नाराज

अभिनेता अरबाज खान सध्या त्याच्या ‘पिंच बाय अरबाज खान’ या यूट्युब शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जाणारे वाईट कमेंट आणि ट्रोलिंग विषयासंबंधीत प्रश्न विचारले जातात. करण जोहर, सोनाक्षी सिन्हा, सनी लिओनी, कपिल शर्मा, करीना कपूर आदी कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. मात्र,या शोमध्ये करीना कपूरला केलेल्या एक यूजर्सच्या ‘आंटी’ या कमेंटवर प्रश्न विचारले असता. करीना त्या प्रश्नावर नाराज झाली असल्याचे दिसली.

- Advertisement -

ट्रोलमुळे मानसिक खच्चीकरण

अनेक सेलिब्रिटींचे असे म्हणणे आहे की, सेलिब्रिटीना सोशल मीडियावर ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले जात असल्याने नाराज आहेत. सोशल मीडिया यूजर्स सेलिब्रिटींच्या कोणत्याही पोस्टला असभ्य भाषेत टीका करत असतात. त्यामुळे सोशल मीडियाविषयक कायद्यांमध्ये काही प्रमाणात कठोर नियमांचा समावेश करायला हवा. तसेच प्रत्येक सेलिब्रिटींना स्वत:चे मत मांडण्याचे, विचार व्यक्त करण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. मात्र, यूजर्सच्या येणाऱ्या कमेंटमुळे कुठेतरी मानसिक खच्चीकरण होत आहे.

दरम्यान, करीना कपूर तिच्या आगामी ‘गूड न्यूज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. करीना व्यतिरिक्त अक्षय कुमार, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ यांचीही भूमिका आहे. तसेच ‘गूड न्यूज’ चित्रपट ६ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -