kareena Kapoor Corona Negative: करिना झाली कोरोनामुक्त! रिपोर्ट निगेटिव्ह

१२ दिवसांनी करिनाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

kareena Kapoor Corona Negative share instgram story
kareena Kapoor Corona Negative: करिना झाली कोरोनामुक्त! रिपोर्ट निगेटिव्ह

अभिनेत्री करिना कपूर अखेर कोरोनामुक्त झाली आहे. करिनाला एका पार्टीत कोरोनाची लागण झाली होती. करिनाला घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते. १२ दिवसांनी करिनाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने करिना कोरोनामुक्त झाली आहे. करिनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ती कोरोना निगेटीव्ह आल्याचे सांगितले आहे. करिनाने पोस्टमध्ये मुंबई पालिकेचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे तिची बहिण करिश्मा कपूर आणि पती सैफ अली खान यांचे देखील आभार मानले आहेत.

करिनाने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये तिने म्हटलेय, ‘मी कोरोना निगेटिव्ह आले. माझी बहिण करिश्मा कपूरचे मनापासून आभार. तसेच माझी बेस्ट फ्रेंड अमृता तसेच माझे सगळे प्रिय मित्र मैत्रिणी, फॅमिली, पुनी, नैना आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. मी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर माझ्या फॅन्सनी मला अनेक मेसेज केले. मी आता पूर्णपणे ठिक आहे. त्याचप्रमाणे मुंबई पालिकेचे देखील आभार त्यांच्या सपोर्टमुळे हे शक्य झाले. डॉक्टर अविनाश फडके यांची टेस्टिंग लॅब खरंच उत्तम आहे. आणि शेवटी माझा पती सैफ आणि माझी संपूर्ण फॅमिलीचे आभार. सगळ्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा. सगळ्यांनी सुरक्षित रहा. माझ्या बाळांना भेटण्यासाठी मी फार आतूर झाले आहे’.

करिना क्वारंटाइन असल्याने दोन्ही मुलांपासून दूर होती. तैमूर आणि जहांगीरला भेटू न शकल्याने करिनाने पोस्ट लिहित मुलांची आठवण येत असल्याचे सांगितले होते. मात्र करिना आता कोरोनामुक्त झाल्याने ती सर्वात आधी तिच्या बाळांना भेटणार आहे. करिनाची ओमिक्रॉन चाचणीही निगेटिव्ह आली होती. करिनाला कोरोनाची सौम्य लक्षणे होती. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने करिनाने कोरोनावर मात केली आहे.

करिना क्वारंटाइन असताना करिनाची बहिण करिश्मा कपूरने करिनाच्या दोन्ही मुलांना सांभाळले. तैमूर आणि जेस सध्या मावसी करिश्माकडे होते. करिश्मामुळे करिनाची सर्वांत मोठी चिंता मिटली. म्हणून करिनाने पहिल्यांदा बहिण करिश्माचे आभार मानलेत.


हेही वाचा –  ‘मला मुलांची आठवण येतेय’, कोरोना पॉझिटिव्ह Kareena मुलांच्या आठवणीत भावूक